Suicide | (Photo Credits: unsplash.com)

UP Shocker:  लखनऊ येथील मडियाओन परिसरात एका तरुणाने नोकरी गमावल्यामुळे  आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुर्गेश यादव असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. काही महिन्यापासून बेंगळुरू येथील एक आयटी कंपनीत नोकरी करायचा. त्यानंतर त्यांने नोकरी गमावल्यापासून मडियाओन परिसरात राहायचा. दुर्गेशच्या आत्महत्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- बॅंकेत नोकरी करणाऱ्या महिलेची आत्महत्या; सासरे, नवऱ्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल)

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गेश हा मूळचा सिद्धार्थ नगर जिल्ह्यातील रहिवासी होता. तो इंजिनीअरींग करून आयटी क्षेत्रात नोकरीला होता. नोकरी सुटल्यानंतर  दुसऱ्या नोकरीच्या शोधासाठी लखनौमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून भाड्याच्या खोलीत राहत होता अशी माहिती त्याच्या भावाने पोलिसांना दिली. त्याला त्याचा आवडीनुसार नोकरी मिळत नव्हती म्हणून तो नैराश्यात होता. त्याने रविवारी कुटुंबाशी संवाद साधला होता. सोमवारी त्यांने राहत्य खोलीत गळफास लावून आत्महत्या केली.

दुसऱ्या दिवशी त्याच्या भावाने खोलीत जाऊन पाहिले तर दुर्गेश लटकलेल्या अवस्थेत सापडला. नोकरीच्या शोधात असताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. बेरोजगारीमुळे अनेक तरुणांनी आतापर्यंत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी दुर्गेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. खोलीतून कोणतीही सुसाईट नोट सापडली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली.