Gujarat Shocker: गर्लफ्रेंडच्या गरजा पूर्ण करण्यासाठी घरात चोरीसाठी घुसलेल्या 20 वर्षीय तरुणाने केली महिलेची हत्या; आरोपीला अटक
Murder | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Gujarat Shocker: गुजरातमधील राजकोट येथून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. गर्लफ्रेंडच्या गरजा पूर्ण करण्यासाठी घरात चोरीसाठी घुसलेल्या 20 वर्षीय तरुणाने केली महिलेची हत्या केली आहे. 14 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अद्याप आरोपीची ओळख जाहीर केलेली नाही. हेमाली वारू असं मृत महिलेचं नाव आहे. घरातील मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम चोरण्याच्या उद्देशाने आरोपींने हा गुन्हा केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीला त्याच्या प्रेयसीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे हवे होते, असे तपासात सहभागी असलेल्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमाली 14 फेब्रुवारी रोजी तिच्या घरातील बेडवर रक्ताच्या थारोळ्यात सापडली होती. तिच्या शरीरावर चाकूच्या अनेक जखमा होत्या. सुरुवातीला त्यांना हेमालीचा पती अल्पेश वारू याचा हत्येत सहभाग असल्याचा संशय होता. परंतु तपासात त्यांच्या शेजाऱ्यानेच हा गुन्हा केल्याचे उघड झाले.

या प्रकरणातील आरोपी हा मृत महिलेच्या शेजारी राहत होता. आम्ही आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करत आहोत, असे पोलिस उपायुक्त डॉ. पार्थराजसिंह गोहिल यांनी सांगितले. गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींकडून चोरीचे दागिने आणि रोख रकमेसह इतर मौल्यवान वस्तूही जप्त केल्या आहेत. पोलिसांनी आरोपीची ओळख सांगण्यास नकार दिला आहे. (हेही वाचा - Kerala Shocker: मुलगी प्रियकरासोबत पळून गेली, आई-वडिलांची नैराश्यातून आत्महत्या, केरळमधील धक्कदायक घटना)

तथापि, राजकोट गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले की, हेमालीच्या हत्येमागे चोरी हा मुख्य हेतू होता. आरोपी सुरत शहरातील फर्निचर दुकानात काम करतो. गुन्हा करण्याच्या तीन दिवस आधी तो शहरात राहणाऱ्या आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी राजकोटला आला होता. त्याच्या मैत्रिणीने त्याच्याकडे पैशांची मागणी केली म्हणून त्याने तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा गुन्हा केला. चौकशीत आरोपीने स्वतःच्या घरातून मौल्यवान वस्तू चोरल्याचे कबूल केले, असे पोलिसांनी सांगितले. (Bhopal Shocker: व्हॅलेंटाईन डेला प्रेयसीला घरी आणण्यास दिला नकार; संतापलेल्या मुलाने आईची गळा दाबून केली हत्या, आरोपीला अटक)

प्राप्त माहितीनुसार, हेमाली आणि तिचा पती गेल्या सात महिन्यांपासून जामनगर रोडवरील शिवसागर सोसायटीत राहत होते. त्यांना दोन वर्षांची मुलगीही आहे. 14 फेब्रुवारी रोजी हेमाली आणि अल्पेश त्यांच्या नित्यक्रमानुसार कामावर गेले. दुसऱ्या दिवशी केशोदला जायचे असल्याने ते दुपारी परत आले. परत आल्यानंतर अल्पेश काही कामानिमित्त बाहेर गेला तर हेमाली आणि तिची मुलगी एकत्र जेवण करत होते. अल्पेश परत आला असता त्याच्या घराचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचे दिसले. तो पत्नीला फोन करत होता, पण तिने फोन उचलला नाही. तो दरवाजा उघडून घरात शिरताच त्याची मुलगी त्याच्याकडे धावली आणि त्याला चिकटली. त्यांची पत्नी पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. यावेळी त्याला कपाटाची तोडफोड झाल्याचं दिसलं.