Kerala Shocker: मुलगी प्रियकरासोबत पळून गेली, आई-वडिलांची नैराश्यातून आत्महत्या, केरळमधील धक्कदायक घटना
केरळमध्ये एका पालकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलीने घरांच्या विरोधात प्रेमविवाह केल्याने तिच्या पालकांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.
Kerala Shocker: केरळमध्ये एका पालकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलीने घरांच्या विरोधात प्रेमविवाह केल्याने तिच्या पालकांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना केरळ मधील कोल्लम जिल्ह्यात घडली आहे. कोल्लम जिल्ह्यातील पावुंबा येथील रहिवासी उन्नीकृष्ण पिल्लई आणि त्यांची पत्नी बिंदू पिल्लई अशी मृतांची नावे आहेत. यांची मुलगी कॉलेजमध्ये शिकत होती. दरम्यान तिला एका मुला सोबत प्रेम झालं आणि त्याच्यासोबत लग्न करायाचा विचार केला. ही गोष्ट आई वडिलांना कळताच, त्यांनी विरोध केला. (हेही वाचा- अवैध संबंधाचे रहस्य झाले उघड; पत्नीने प्रियकरासह पतीची केली हत्या)
मिळालेल्या माहितीनुसार, घरात मुलीचे प्रेमप्रकरण असल्याचे समजले त्यावेळी त्यांनी मुलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु तीने न ऐकता घरांच्या विरोधा मुलासोबत पळून जाऊन लग्न केला. घरांना मुलगा आवडला नाही त्यामुळे त्यांनी नकार दिली. तिच्या जाण्यानंतर आई वडिलांवर दुखांचे डोंगरच कोसळला. दोघे ही नैराश्यात गेले. त्यांच्यावर उपचार सुरु होते. दोघांनी औषधाचे अतिसेवन केले आणि आपलं आयुष्य संपवले. मुलगी पळून गेली त्यामुळे दोघे ही बराच दिवस मानसकिदृष्टया आजारी होते.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोघांच्या मृतांचा पंचनामा केला. मुलीला या घटनेची माहिती मिळताच, तीनं हंबरडा फोडला. पोलिस या प्रकरणी चौकशी करत आहे. डॉक्टरांनी दोघांना तपासल्यावर समजले की औषधाच्या अतिसेवनामुळे दोघांचा मृत्यू झाला.
(The above story first appeared on LatestLY on Feb 19, 2024 09:17 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

