Electricity Bill Payment: तामिळनाडू-महाराष्ट्रासह 13 राज्ये वीज खरेदी करू शकणार नाहीत; 5000 कोटींची थकबाकी न भरल्यास होणार कारवाई
Electricity | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Electricity Bill Payment: सार्वजनिक क्षेत्रातील पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लि. (POSOCO) ने IEX, PXIL आणि HPX या तीन पॉवर मार्केटला 13 राज्यांमधील 27 वीज वितरण कंपन्यांचा वीज व्यवसाय थांबवण्यास सांगितले आहे. वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडे या वितरण कंपन्यांची मोठी थकबाकी आहे. प्रत्यक्षात, या 13 राज्यांकडे 5000 कोटींहून अधिकची थकबाकी आहे, जी अद्याप भरलेली नाही.

POSOCO ने इंडियन एनर्जी एक्सचेंज (IEX), पॉवर एक्स्चेंज ऑफ इंडिया (PXIL) आणि हिंदुस्थान पॉवर एक्सचेंज (HPX) यांना 13 राज्यांच्या वितरण कंपन्यांच्या व्यापारावर निर्बंध घालण्याचे निर्देश दिले आहेत. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार, छत्तीसगड आणि झारखंड यांचा समावेश आहे. ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे POSOCO, देशातील ऊर्जा प्रणालीच्या एकात्मिक ऑपरेशनचे व्यवस्थापन करते. (हेही वाचा - Bank FD Rates Increased: खासगी क्षेत्रातील 'या' मोठ्या बँकेने वाढवले एफडीचे दर; येथे जाणून घ्या नवे दर)

दरम्यान, POSOCO ने तीन पॉवर मार्केटला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 13 राज्यांमधील 27 वितरण कंपन्यांसाठी वीज बाजारातील सर्व उत्पादनांची खरेदी आणि विक्री 19 ऑगस्ट 2022 पासून पुढील सूचना येईपर्यंत पूर्णपणे प्रतिबंधित असेल. या वितरण कंपन्यांची थकबाकी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

पेमेंट सिक्युरिटी सिस्टीम अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील वीज वितरण कंपन्यांना वीज बाजारपेठेत उत्पादन करणार्‍या कंपन्यांना थकबाकी न भरल्याबद्दल बंदी घातली जाऊ शकते. या अंतर्गत, पुरेशी पेमेंट सुरक्षा व्यवस्था ठेवली गेली असेल किंवा त्याच्या अनुपस्थितीत आगाऊ पैसे दिले गेले तरच वीज पुरवठा केला जाईल. या निर्णयामुळे या 13 राज्यांमध्ये विजेचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.