Vikram Gokhale Health Update| PC: Twitter/ANI

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्या प्रकृतीबाबत मागील 24-48 तास चिंता व्यक्त करण्यात आली होती. मात्र आता त्यांच्या प्रकृतीमध्ये किंचित सुधारणा नोंदवण्यात आली आहे. 77 वर्षीय विक्रम गोखले 5 नोव्हेंबर पासून रूग्णालयात उपचार घेत आहेत. पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये (Deenanath Mangeshkar Hospital) विक्रम गोखले दाखल आहेत. आज (24 नोव्हेंबर) दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या पीआरओ Shirish Yadgikar यांनी दिलेल्या माहितीमध्ये,'विक्रम गोखले यांची प्रकृती थोडी सुधारली आहे. ते आता डोळे उघडत आहेत. हात-पाय हलवत आहेत. येत्या 48 तासांमध्ये त्यांचा व्हेंटिलेटर हटवला जाऊ शकतो तसेच त्यांचा बीपी, हार्ट सामान्य असल्याचं सांगण्यात आले आहे.

Dr Dhananjay Kelkar यांच्या निगारणीखाली पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये विक्रम गोखलेंवर उपचार सुरू आहेत. 2 दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगण्यात आले होते. यामध्येच त्यांच्या निधनाचं देखिल वृत्त आलं. मात्र गोखले कुटुंबाकडून ही सारी वृत्त फेटाळण्यात आली.

विक्रम गोखलेंचं हेल्थ अपडेट 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

A post shared by BBC News Marathi (@bbcnewsmarathi)

विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली तसेच स्नेही राजेश दामले यांनी मीडीयाला खोटं वृत्त न पसरवण्याचं आवाहन केले आहे. नक्की वाचा: Vikram Gokhale Health Update: विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त अफवा; प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याची पत्नीची माहिती .

विक्रम गोखले वयाच्या 26व्या वर्षी 1971 मध्ये अमिताभ बच्चन स्टारर 'परवाना' या चित्रपटातून सिनेसृष्टीत आले. 40 वर्षांहून अधिक कालावधीच्या कारकिर्दीत, गोखले 1990 मध्ये अमिताभ बच्चन अभिनीत 'अग्निपथ' आणि 1999 मध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासोबत 'हम दिल दे चुके सनम' यासह विविध मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसले.