शूटिंगदरम्यान विक्की कौशलचा जबर अपघात; फ्रॅक्चरसह चेहऱ्यावर पडले 13 टाके
Vicky Kaushal. (Photo Credits: File Photo)

उरी चित्रपटाद्वारे रातोरात स्टार बनलेला अभिनेता विकी कौशलचे (Vicky Kaushal), या भूमिकेमुळे बरेच कौतुक झाले. विकीने घेतलेल्या मेहनतीमुळे अनेकजण प्रभिवीत झाले होते. आता विकी त्याच्या आगामी दिग्दर्शक भानु प्रताप सिंह यांच्या एका हॉरर चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान विकीचा फार मोठा अपघात झाला आहे. या अपघातात त्याला जबरदस्त मार लागला असून चेहऱ्यावर 13 टाके घालण्यात आले आहेत. तरण आदर्श यांनी ट्विटर अकाउंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे.

गुजरातमध्ये या चित्रपटाचे शुटींग चालू होते, त्यावेळी अॅक्शन सीक्वेन्स शूट करत असताना हा अपघात झाला. यामुळे त्याच्या चेहऱ्याचे हाड (चीकबोन) फ्रॅक्चर झाले आहे, त्यासाठी 13 टाके घालण्यात आले आहेत. 18 एप्रिल रोजी हा अपघात घडला. सध्या मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. समुद्र किनारी उभ्या असणाऱ्या एका जहाजावर आधारित हा चित्रपट आहे. गुजरातच्या शिप ब्रेकिंग यार्डमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. (हेही वाचा: चित्रीकरणादरम्यान या कारणामुळे खराब झाला भूमी पेडणेकरचा चेहरा; होरपळलेली त्वचा आणि काळ्या डागांचा फोटो व्हायरल)

दरम्यान विकीसोबत भूमी पेडणेकर या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारत आहे. याव्यतिरिक्त भूमी 'सांड की आंख' (Saand Ki Aankh) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटासाठी उन्हात हेवी मेकअपमध्ये शुटींग केल्याने भूमीचा चेहराही पूर्णतः बिघडला आहे. चेहऱ्यावर अनेक डाग पडलेले असून, चेहरा पूर्णतः होरपळला आहे. सध्या भूमीचा हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.