Tunisha Sharma Postmortem Report: टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) च्या आत्महत्येच्या (Suicide) बातमीने इंडस्ट्रीतील लोकांना आणि तिच्या चाहत्यांना मोठी धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या आईने तिच्या मुलीचा सहकलाकार शीझान मोहम्मद खान विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तक्रार दाखल केली, ज्यावर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली. तुनिषा शर्माचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला होता, ज्याच्या रिपोर्टवरून मोठी बातमी समोर आली आहे.
तुनिषा शर्माच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर पोलिसांनी कोणतेही सार्वजनिक वक्तव्य दिलेले नाही. मात्र, अभिनेत्री गरोदर असल्याचे त्यांनी स्पष्टपणे नाकारले आहे. अद्याप तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. साधारणपणे फाशी दिल्यानंतर गुदमरल्याने मृत्यू होतो. त्यामुळे पोलिस तुनिषाने गळ्यात बांधलेला दुपट्टा शोधत आहेत. तथापि, आतापर्यंत या प्रकरणात गर्भधारणेशी संबंधित काहीही पुरावे मिळालेले नाहीत. (हेही वाचा - Tunisha Sharma Death Case:अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या तिच्या सहकलाकार Sheezan Khan ला 4 दिवसांची पोलिस कोठडी)
शीझान खानला न्यायायात हजर करण्यात आले -
दुसरीकडे या आत्महत्येप्रकरणी तुनिषाचा सहकलाकार शीजान मोहम्मद खान याला पोलिसांनी वसई न्यायालयात हजर केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी शीजनला 5 ते 6 दिवसांची कोठडी मागितली आहे. पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, पोस्टमॉर्टम अहवालात तुनिषा शर्माचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असल्याचे पुष्टी दिसते. मात्र, अद्याप पूर्ण अहवाल आलेला नाही.
या प्रकरणात, इतर डॉक्टरांनी त्यांच्या अहवालात काय लिहिले आहे ते विचारात घेऊनच पोलिस त्यांचा तपास करू शकतात. तथापि, अभिनेत्रीच्या गर्भधारणेची अद्याप पुष्टी झालेली नाही. अशा स्थितीत तुनिशा आई होणार होती, असे म्हणणे चुकीचे ठरेल. शवविच्छेदन अहवालाची संपूर्ण प्रत मिळाल्यावर, त्याचे पूर्ण वाचन केल्यानंतरच आम्ही पुढील तपास करू, असे पोलिसांनी सांगितले आहे.