तुझ्यात जीव रंगला (Tuzyat Jeev Rangla) या प्रसिद्ध मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहचलेल्या मिलिंद दास्ताने (Milind Dastane) या मराठी अभिनेत्यावर औंध (Aundh) येथील पीएनजी ब्रदर्स (PNG) या दागिन्यांच्या व्यापाऱ्यांनी अफ़रातफ़रीचा आरोप लावला आहे. दास्ताने दाम्पत्यांने तब्बल 25 लाख रुपये किमतीच्या दागिन्यांची आणि सोन्याच्या बिस्किटांची खरेदी करून त्याचे पैसेच चुकवले नाहीत असा आरोप पीएनजी ब्रदर्सच्या अक्षय गाडगीळ (Akshay Gadgil) यांनी केला आहे. याबाबत अभिनेता मिलिंद दास्ताने आणि त्यांची पत्नी सायली दास्ताने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औंध येथील चतुःश्रुंगी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
औंध मधील पीएनजी ब्रदर्स'च्या दागिन्यांच्या दुकानात आरोपी मिलिंद दास्ताने आणि त्यांचे पत्नी सायली हे मागील वर्षी सोन्याच्या खरेदीसाठी या दुकानात गेले होते दुकानाचे व्यवस्थापक नीलेश दास्ताने हे मिलिंद यांच्या ओळखीचे होते. यावेळी त्यांनी आपल्या जवळील 3 हजार 885 रुपयांचे जुने सोन्याचे दागिने देऊन दुकानातून 4 लाख 92 हजार रुपयांचे दागिने खरेदी केले. त्यांनी या रक्कमेचे दोन चेक देखील नीलेश यांना देऊ केले मात्र आपण काही दिवसात सांगितल्यावर मगच हे चेक बँकेत टाका असे सुद्धा सांगितले. यांनतर मिलिंद पुन्हा दोन दिवसांनी खरेदीसाठी दुकानात आले. त्या वेळी त्यांनी यापूर्वी दिलेले चेक परत घेऊन दुसऱ्या बँकेचे पुन्हा दोन चेक दिले. पण हे दोन्ही चेक बाउन्स झाल्याने पीएनजी दुकानाला काहीच पेमेंट मिळाले नव्हते .
यांनतर काही दिवसांनी दुकानाच्या हिशोबात गडबड आढळल्याने नीलेश यांच्याकडे विचारणा केली, त्यावेळी नीलेश यांनी मिलिंद यांच्याशी झालेल्या व्यवहाराविषयी तसेच त्यांच्या ओळखीविषयी सांगून पैसे येण्यास अडचण येणार नाही असा विश्वास दर्शवला. अक्षय यांनी देखील पैसे आले नाहीत तर व्याजाचे पैसे नीलेश यांना भरायला लागतील अशी ताकीद देत विषय थांबवला. मात्र अनेक दिवस लोटून गेल्यावर देखील मिलिंद यांनी कोणतेही पेमेंट दिले नाही. त्यामुळे अक्षय यांनी स्वतः त्यांच्याशी संपर्क साधला, त्यावेळी देखील मिलींद यांनी आपले काही प्रॉपर्टीचे व्यवहार सुरु आहेत व ते संपल्यावर पूर्ण पेमेंट सांगितले व पुन्हा विषय टाळला. बाळासाहेबांसाठी कायपण, अभिनेता प्रविण तरडेंनी कापली मिशी
18 ऑक्टोबर रोजी मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नी पुन्हा दुकानात आले. त्यांनी सोन्याचे दागिने, बिस्किटे, हिऱ्याची अंगठी, चांदीचे दागिने असे एकूण 25 लाख 69 हजार रुपयांचे दागिने खरेदी केले. या वेळेची रक्कम मोठी असल्याने अक्षय हे वारंवार मिलिंद यांना कॉल करून पेमेंट बाबत विचारणा करू लागले मात्र याचा काही फायदा न होता उलट मिलिंद यांनी सतत वेगळी करणे द्यायला सुरवार केली त्यामुळे अखेरीस वैतागून अक्षय यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात दास्ताने दाम्पत्याच्या विरुद्ध तक्रार नोंदवली.