तमिळनाडू: टीव्ही अभिनेत्री  S. Devi हिने पतीसमोर केलेल्या बेदम मारहाणीत एक्स बॉयफ्रेंडचा मृत्यू
Kill | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

एका तामिळी टीव्ही (Tamil Television) अभिनेत्रीने केलेल्या बेदम मारहाणीत तिच्या माजी प्रियकराचा (Ex-Boyfriend) मृत्यू झाला आहे. ही अभिनेत्री 42 वर्षे वयाची असून, एस. देवी (Tamil Television Actress  S. Devi) असे तिचे नाव असल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. एस. देवी हिने कोलाथूर (Kolathur) येथील बहिणीच्या घरात हे कृत्य सोमवारी (30 डिसेंबर 2019) केले. धक्कादायक म्हणजे एस देवी (Actor S. Devi)  हिने आपल्या पतिसमोरच आपल्या माजी प्रियकराला मारहाण केली. घटनेत मृत्यू झालेल्या माजी प्रियकराचे नाव एम.रवि (वय-38 वर्षे) असल्याचे समजते. मृत एम.रवि (M Ravi) चित्रपटसृष्टीत टेक्निशियन म्हणून कार्यरत होता.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, माजी प्रियकराने एस देवी हिच्यावर जुने प्रेमसंबंध नव्याने सुरु करण्याबाबत दबाव टाकला असता तिने त्याची हत्या केली. प्रियकराची हत्या केल्यानंतर एस. देवी ही स्वत:हूनच पोलिसांच्या स्वाधिन झाली. पोलिसांनी घटनेचा तपास केल्यावर एस. देवी, तिचा पती बी शंकर (वय 53) बहिण एस. लक्ष्मी आणि एस देवी अशा तिघांना अटक केली आहे. (हेही वाचा, कुशल पंजाबी याने का केली आत्महत्या? जाणून घ्या त्या मागचं खरं कारण)

एस देवी ही तामिळ टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून भूमिका करते. एका मालिका चित्रिकरणादरम्यान सेटवर अभिनेत्री एस देवी आणि टेक्निशियन एम. रवि यांची भेट झाली. दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली. पुढे या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. पुढे बराच काळ दोघांमधील प्रेमसंबंध सुरु होते. दोन वर्षांपूर्वी एस देवी आणि एम रवि यांच्यातील प्रेमसंबंधांबाबत देवी हिच्या कुटुंबीयांना कळले. कुटुंबीयांनी एस देवी हिच्यावर एम रवि याच्यासोबत असलेले प्रेमसंबंध तोडण्यासाठी दबाव टाकला. दरम्यान, दोघांच्या प्रेमाचा शेवट एकाच्या हत्येने झाला.