Kushal Punjabi (Photo Credits: Instagram)

Kushal Punjabi's Suicide Reason: टेलिव्हिजन अभिनेता कुशल पंजाबी यांच्या आत्महत्येची बातमी पसरताच, संपूर्ण मनोरंजन सुर्ष्टीला याने धक्का बसला आहे. अनेक टीव्ही कलाकारांनी कुशलच्या निधनानंतर सोशल मेडियावर हळहळ व्यक्त केली आहे तर त्याच्या इंडस्ट्रीतील काही मित्रांना आपले अश्रू अनावर झाले. परंतु, त्याने आत्महत्या का केली असा प्रश्न सध्या विचारला जात आहे? त्यामागचं नेमकं कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

स्पॉटबॉय इ या वेबसाईटने कुशल पंजाबीच्या आत्महत्येमागचं कारण स्पष्ट करणार एक रिपोर्ट प्रदर्शित केला आहे. अभिनेत्याच्या एका खास मित्राने असे म्हटले आहे की कुशल आणि त्याच्या बायकोमधील अयशस्वी लग्नामुळे त्याची जगण्याची इच्छा संपली होती. ऑड्रे डोल्हेन हिच्याबरोबर त्याचे लग्न झाले होते. आणि दोघंही आधी खूप आनंदी दिसायचे. परंतु प्रत्यक्षात मात्र तसे नव्हते. मित्र असंही म्हणाला की कुशल आणि ऑड्रे हे नवरा बायको म्हणून सोबत राहत नव्हते. त्याची बायको त्यांच्या मुलासह शांघाय येथे राहत होती. दरम्यान या जोडप्याने 2015 मध्ये गोव्यात लग्न केले होते.

काही वेळा कुशल आपल्या मुलाला भेटण्यासाठी तिथे गेलाही. परंतु तो आणि त्यांची पत्नी पुन्हा एकत्र येण्यास अपयशी ठरले. सुरुवातीच्या काळात कामाच्या कारणास्तव त्यांना लांब राहावे लागत होते, परंतु हळूहळू हा दुरावा वाढत गेला. कुशल देखील इंडस्ट्रीमध्ये चांगले काम मिळत नव्हते. तो खूपच भावनिक आणि संवेदनशील माणूस होता, असं देखील मित्राने म्हटलं आहे.

अभिनेता कुशल पंजाबी याची राहत्या घरी आत्महत्या; करणवीर बोहरा याने शेअर केली भावनिक पोस्ट

अलीकडे गोष्टी इतक्या बिघडल्या की त्याने आणि त्याच्या पत्नीने घटस्फोटावर विचार करण्यास सुरुवात केली. कुशल हा धक्का सहन करू शकला नाही.

Kushal Punjabi याने का केली आत्महत्या? जाणून घ्या त्या मागचं खरं कारण Watch Video

दरम्यान कुशलच्या सुसाईड नोटमध्ये कुणालाही दोष दिला गेला नसला, तरी त्याने लिहिलेली एक ओळ सर्व गोष्टी स्पष्ट करते. तो लिहितो, "विवाह एक जुगार आहे आणि ते स्वर्गात लिहिलेले नाहीत?