Taarak Mehta Ka Ooltah Chashmah कार्यक्रमात 'दयाबेन' ची भुमिका साकारण्याबद्दल दिव्यांका त्रिपाठीने दिले 'हे' स्पष्टीकरण
Divyanka and Dayaben (Photo Credits-Facebook)

टेलिव्हिजन वरील अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) गेल्या काही दिवसांपासून डेली सोपच्या दुनियेपासून दूरावली गेल्याचे दिसून येत आहे. दिव्यांका हिला अखेर 'ये है मोहब्बते' मध्ये पाहिले होते. पण तिच्या चाहत्यांकडून तिच्या पुढील चित्रपटाची प्रतीक्षा केली जात आहे. तिने नुकतीच क्राइम पेट्रोलची एक सीरिज होस्ट केली होती. आता खतरो के खिलाडी 11 वा सीजनमध्ये ती झळकणार आहे. मीडिया रिपोर्ट्स नुसार, अशी चर्चा सुरु होती की कॉमेडी शो तारक मेहता का उल्टा चष्मा मध्ये ती दयाबेनची भुमिका साकारणार आहे. यावर आता दिव्यांका त्रिपाठीने स्पष्टीकरण दिले आहे.

सर्वांनाच माहिती आहे की, दयाबेनची भुमिका दिशा वाकानी हिने साकारली होती. या अभिनेत्रीने 207 मध्ये मॅटरनिटी ब्रेकसाठी शो सोडला होता आणि तेव्हापासून ती यामध्ये दिसून येत नाही आहे. मात्र तिची पुन्हा कार्यक्रमात एन्ट्री होण्याबद्दल सुद्धा काही अफवा समोर आल्या. तर दयाबेनची भुमिका साकारण्यासाठी विविध अभिनेत्रींची नावे सुद्धा समोर आली होती. मात्र अशातच एक अफवा अशी होती की, दिव्यांका त्रिपाठी दयाबेन हिची भुमिका साकारणार आहे. पण यावर दिव्यांका हिने म्हटले की, अशा पद्धतीच्या गोष्टी खरंतर खोट्या असतात.(बाळासाहेब ठाकरेंचा नातू Aishwarya Thackeray व अभिनेत्री Aalia Furniturewalla यांच्या डेटिंगची चर्चा; समोर आले 'हे' सत्य)

पुढे दिव्यांकाने म्हटले की, तारक मेहता का उल्टा चष्मा हा एक शानदार शो आहे. याचे मोठे फॅन फॉलोअर्ससुद्धा आहेत. त्यामुळे मला वाटत नाही की, मी यामध्ये भुमिका करण्यास उत्सुक आहे. मी एका नव्हा आव्हानाच्या शोधात आहे. त्यामुळे आता स्पष्ट होते की, दिव्यांका दयाबेन हिची भुमिका साकारणार नाही आहे.