अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आलिया फर्निचरवाला (Aalia Furniturewalla) सध्या बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावत आहे. अभिनेत्री आलिया फर्निचरवाला अशा न्यू कमर्स अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांच्या अफेअरची खूप चर्चा होत आहे. आता चर्चा आहे की आलिया, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा नातू ऐश्वर्य ठाकरेला (Aishwarya Thackeray) डेट करत आहेत. बर्याच प्रसंगी दोघांना एकत्र पाहिले गेले आहेत. ऐश्वर्य हा स्मिता ठाकरे यांचा मुलगा आहे. ऐश्वर्यच्या दुबईच्या बर्थडे पार्टीमध्येही आलिया दिसली होती.
आता पहिल्यांदाच आलियाने या संपूर्ण प्रकरणाबाबत मौन सोडले आहे. आलियाने सांगितले आहे की, ऐश्वर्य हा माझा 'बेस्ट फ्रेंड' आहे. ईटाइम्सशी बोलताना आलिया म्हणाली, 'जर तुमच्याविषयी बोलले जात असेल तर चांगली गोष्ट आहे. परंतु असे अफेअर्सचे रिपोर्ट्स कधीही फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ऐश्वर्य एक उत्तम मित्र आणि अतिशय हुशार व्यक्ती आहे. आमच्या अफेअरच्या चर्चेमुळे माझ्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढली होती, परंतु आता त्यांनाही याची सवय झाली आहे.’ (हेही वाचा: Rhea Chakraborty ने Sushant Singh Rajput याच्या निधनाच्या 1 वर्षानंतर शेअर केला Happy फोटो)
आलिया पुढे म्हणते. ‘माझ्या वैयक्तिक जीवनाबाबत मी जास्त विचार करीत नाही. सध्या मी माझ्या व्यावसायिक जीवनावर फोकस करत आहे. मला वाटते की माझ्या वैयक्तिक आयुष्यात जे काही घडायचे असेल ते नैसर्गिकरित्या होईलच, आपण केवळ आपल्या कामाबद्दल विचार केला पाहिजे.’
जेव्हा या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली, तेव्हा आलियाने सांगितले होते की, ऐश्वर्य एक कौटुंबिक मित्र आहे. आपण अनेक वर्षांपासून त्याला ओळखत असल्याचे ती म्हणाली होती. हे दोघेही एकत्र मृत्य व अभिनय क्लासेसला जात होते. हे पाहूनच त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. नोव्हेंबर 2019 मध्ये आलिया ऐश्वर्यच्या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली होती.