Rhea Chakraborty ने Sushant Singh Rajput याच्या निधनाच्या 1 वर्षानंतर शेअर केला Happy फोटो
रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूत (Photo Credits: Instagram)

Rhea Chakraborty Photo: बॉलिवूड मधील अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचे नाव सध्या अशा ठिकाणी पोहचले आहे की जणू तिला कोणीही ओळखत नाही. सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी मोठ्या आरोपांमध्ये अडकलेल्या रिया हिच्या विरोधात सोशल मीडिया संताप व्यक्त करण्यात आला होता. परंतु रिया हिने या परिस्थितीत खंबीर राहत समोर आलेल्या संकटांचा सामना केला. अशातच आता तिचे आयुष्य हळूहळू पुर्वपदावर येताना दिसून येत आहे.

रिया चक्रवर्ती हिने सुशांतच्या मृत्यूनंतर 1 वर्षानंतर आपला हॅप्पी फेस असलेला एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ही हसताना दिसून येत असून तिने असे म्हटले की, Rise and Shine. आपला भुतकाळ विसरुन रिया आता नव्याने आयुष्याची सुरुवात करणार असल्याचे यामधून प्रतित होते. सोशल मीडियातील तिचा हा फोटो खुप व्हायरल होत असून सर्वांचे लक्ष तिच्याकडे वेधले जात आहे.(365 Days अभिनेता Michele Morrone लवकरच करू शकतो बॉलिवूडमध्ये डेब्यू; Karan Johar ने संपर्क साधल्याची चर्चा)

रिया चक्रवर्ती (Photo Credits-Instagram)

दरम्यान, 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला कायदेशीर कारवायांना सामोरे जावे लागले होते. त्यानंतर सीबीआय, एनसीबी ते ईडी च्या चौकशांना तिने उपस्थिती लावली होती.

सप्टेंबर महिन्यात रिया हिला सुशांतच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांनी तिला जामिनावर सोडण्यात आले होते. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी अद्याप तपास सुरु असून रियाची यामधून सुटका झालेली नाही.