Sugandha Mishra And Sanket Bhosale Got Engaged: सुगंधा मिश्रा-संकेत भोसले यांचा साखरपुडा संपन्न; फोटो शेअर करत दिली आनंदवार्ता (See Pics)
Sugandha Mishra And Sanket Bhosale (Image Credit: Twitter)

लोकप्रिय कॉमेडियन सुगंधा मिश्रा (Sugandha Mishra) आणि संकेत भोसले (Sanket Bhosale) यांचा साखरपूडा संपन्न झाला आहे. सोशल मीडियावर रोमांटिक फोटो शेअर करत त्यांनी ही आनंदवार्ता आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सुगंधा-संकेत दीर्घ काळ एकमेकांना डेट करत होते. मात्र दोघेही आपल्या नात्याबद्दल कधी मोकळेपणाने बोलले नाहीत. आता साखरपूडा करत आता त्यांनी नात्याला नवं नाव दिलं आहे. 'द कपिल शर्मा शो' या लोकप्रिय कॉमेडी शो मध्ये सुगंधाने टीचर विद्यावतीची भूमिका साकारली होती. तर संकेत भोसले हा संजय दत्तची मिमिक्री करण्यासाठी ओळखला जातो.

सुगंधा आणि संकेत दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत आपले नाते जगजाहीर केले आहे. लवकरच दोघेही विवाहबंधनात अडकतील. त्यांच्या या फोटोवर कलाकार, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सुंगधाने फोटो शेअर करत 'Forever' असं लिहिलं आहे. सोबत अंगठी आणि हार्टची इमोजी देखील जोडली आहे.

पहा फोटोज:

संकेत भोसले याने फोटो शेअर करत 'Found My Sunshine' असं म्हटलं आहे. सोबत अंगठी आणि हार्टचा इमोजी देखील दिसत आहे. दरम्यान, सुगंधा-संकेत यांच्या या फोटोंना चाहत्यांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

संकेत भोसले कॉमेडीयन असून 'बाबा की चौकी' हा त्याचा शो देखील अत्यंत लोकप्रिय आहे. या शोमध्ये तो अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची मुलाखत घेतो. सुगंधा लता मंगेशकर यांची हुबेहुब नक्कल करते. तसंच कंगना रनौत ची स्टाईलही तिला अगदी मस्त जमते.