Kapil Sharma च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! फेब्रुवारी मध्ये बंद होणार 'द कपिल शर्मा शो'
The Kapil Sharma Show (Photo Credits: Instagram)

हिंदीतील कॉमेडी किंग कपिल शर्मा (Kapil Sharma) च्या 'द कपिल शर्मा' (The Kapli Sharma Show) कार्यक्रमाने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. हास्याने भरलेली त्याची ही तुफान एक्सप्रेस प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरली. लॉकडाऊन काळातही या शो मुळे अनेकांच्या चेह-यावर हसू उमटले. मात्र आता हेच हसू काही दिवस तुमच्या चेह-यावर पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांचा हा आवडता शो 'द कपिल शर्मा' लवकरच बंद होणार आहे. फेब्रुवारीमध्ये या कार्यक्रमाचा शेवटचा एपिसोड होणार आहे. या कार्यक्रमामध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले. यात कपिल शर्माने या पाहुण्यांची तसेच या पाहुण्यांनी या कलाकारांची चांगलीच फिरकी घेतली.

या शो मधील पाहुणे आणि कलाकारांमधील तू तू मैं मैं ला चाहत्यांनी देखील भरभरून प्रेम दिले. मात्र लॉकडाऊन कोरोनाचे नियम पाळत या शो मध्ये लाईव्ह प्रेक्षक बंद झाले आणि त्यांचे फ्लेक्स प्रेक्षकांच्या स्थानावर ठेवण्यात आले. त्यात कोरोनाचा धोका लक्षात या कार्यक्रमात सेलिब्रिटी येण्यासही टाळाटाळ करत होते. तसेच चित्रपटगृहात मोठे चित्रपटही प्रदर्शित होत नव्हते. म्हणून कलाकारही या शोमध्ये सहभागी होत नव्हते. या सर्वांचा विचार करुन हा शो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.हेदेखील वाचा- Kapil Sharma ने व्हिडिओ शेअर करत आपल्या चाहत्यांना दिली 'गुड न्यूज'; नेटफ्लिक्स वर करणार डिजिटल डेब्यू

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यात या कार्यक्रमाचा शेवटचा एपिसोड होणार आहे. त्यामुळे कपिल शर्मा आपल्याला छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार नाही म्हणून त्याचे चाहते दु:खी आहेत. अशा चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे कपिल शर्मा लवकरच नेटफ्लिक्सवर एका वेबसीरिजच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे. कपिल सध्या या वेबसीरिजच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन द कपिल शर्मा शोच्या निर्मात्यांनी हा शो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात कपिल शर्मा दुस-यांदा बाबा होणार असल्याची बातमी मध्ये सोशल मिडियावर शेअर केली होती. त्यामुळे त्याला आपल्या पत्नीसोबत क्वालिटी टाईम घालवायचा आहे. म्हणून त्याला हा ब्रेक घ्यायचा होता.