कपिल शर्मा (Image Credit: Instagram)

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) आपल्या चाहत्यांची करमणूक करण्यासाठी आता डिजिटल जगात पाऊल ठेवणार आहे. खुद्द कपिल शर्मा यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. सोमवारी, कपिल शर्मा यांनी ट्विट करुन आपल्या चाहत्यांना प्रश्न केला की, इंग्रजीत 'शुभ समाचार' ला काय म्हणतात? त्यानंतर सर्व वापरकर्त्यांनी त्यांना ट्वीट करुन प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर कॉमेडियनने पुन्हा ट्विट करत लिहिलं की, उद्या मी तुझ्याबरोबर एक शुभ बातमी म्हणजेचं Auspicious News शेअर करणार आहे. (वाचा - Akshay Kumar Films in 2021: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यंदा 'या' 6 चित्रपटांमधून बॉक्स ऑफिसवर उडवणार खळबळ; पहा चित्रपटांची लिस्ट)

ज्यानंतर आज कपिल शर्माने आपल्या चाहत्यांना एक व्हिडिओ शेअर करत चांगली बातमी दिली आहे. या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा आपल्या इंग्रजीची खिल्ली उडवताना दिसत आहे. यासह कपिलने नेटफ्लिक्स (Netflix) वर येत असल्याची घोषणा केली आहे. मात्र, त्याने आपल्या प्रोजेक्टबद्दल फारशी माहिती दिलेली नाही. (हेही वाचा - BMC: अरबाज खान, सोहेल खान, निर्वाण खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल; नेमके प्रकरण काय? घ्या जाणून)

कपिलने एका निवेदनात म्हटले आहे की, मी खूप उत्साही आहे, नेटफ्लिक्ससोबत काम करण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. लोकांना दु: ख विसरायला लावून त्यांना आनंद देण, हेचं माझं उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प माझ्या मनापासून अगदी जवळ आहे. मी या प्रोजेक्टची आणखी वाट पाहू शकत नाही.