'सूर नवा ध्यास नवा' या सुरांच्या मैफलीत येणार आहेत काही खास पाहुणे. या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या भागांमध्ये प्रसाद ओक दिग्दर्शित चिन्मय मांडलेकर लिखित 'हिरकणी' या आगामी चित्रपटाची संपूर्ण टीम सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर अवतरणार आहे. याचे शूट नुकतेच करण्यात आले. त्या दरम्यान सोनाली कुलकर्णी, अमित खेडेकर, प्रसाद ओक, राजेश मापुस्कर या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने हिरकणी चित्रपटामधील अंगाई सादर केली तर प्रसाद ओक ने देखील गाणे सादर केले. राजेश मापुस्कर यांनी 3 इडियट्स चित्रपटादरम्यानचा एका किस्सा या मंचावर शेअर केला. तसेच स्वराली जोशीने सादर केलेल्या व्हेंटिलेटर या चित्रपटातील “बाबा” हे गाणे ऐकून राजेश मापुस्कर भावुक झाले.
या एपिसोडमध्ये प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांची लव्हस्टोरी देखील ऐकायला मिळणार आहे. मंजिरी यांनी ते दोघे कसे भेटले, त्यांचे लग्न कसे जुळले या सगळ्या आठवणी सांगितल्या.
इतकंच नव्हे तर या आठवड्यामध्ये स्वप्नील बांदोडकर गेस्ट जज म्हणून सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर उपस्थित असणार आहे.