रसिका सुनील अमेरिकेत साजरा करतेय यंदाचा गणेशोत्सव
photo Credit : Rasik Sunil Instagram Account

झी मराठी वरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून 'शनाया' घराघरात पोहचली. शनाया या भूमिकेने अभिनेत्री रसिक सुनीलला नवी ओळख दिली आहे. तिचा अल्लड, अवखळपणा, बोल्ड अंदाज अनेकांना भावला त्यामुळे शनाया प्रमाणे रसिक सुनील कधी आपलीशी झाली हे कळलंच नाही. मात्र मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असताना रसिकाने मालिकेतून एक्झिट घेतल्याने तिच्या चाहत्यांमध्ये हिरमोड झाला आहे.

रसिका सुनील अमेरिकेत

अभिनेत्री रसिका सुनील सध्या मालिकेतून बाहेर पडून अमेरिकेला शिक्षणासाठी गेली आहे. न्यूयॉर्क फिल्म इन्स्टिटयूटमध्ये रसिका अभिनयाचा अभ्यास करतेय. अमेरिकेत सुरु झालेल्या रसिकांच्या नव्या लाईफमधील धम्मालमस्ती ती सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांसोबत शेअर करत आहे.  रसिकाचं नवं कॉलेज, नवे फ्रेंड्स हे तुम्ही पाहिले असतीलच पण आज रसिकाने अमेरिकेत स्थापन केलेला तिचा पहिला गणपती देखील शेअर केला आहे. रसिकाने इंस्टाग्रामवर अमेरिकेत गणेश चतुर्थी सोहळ्याचे काही फोटो शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

GANESH Chaturthi chya shubheccha LA madhla bappa

A post shared by Rasika Sunil (@rasika123s) on

रसिका लॉस अँजेलिसमध्ये राहते.  अमेरिकेतील या घरी रसिकाने  लहान गणेश  मूर्ती स्थापन करून त्याची पूजा केली आहे. समोर फळांचा नैवेद्य दाखवला आहे. रसिकांच्या भारतातील घरी देखील गणपती बाप्पाचं आगमन होतं मात्र यंदा रसिका अमेरिकेत असल्याने गणेशोत्सवाची धाम धूम मिस करत आहे.  भारताला मिस करत असल्याचं म्हटलं आहे.