
Shaktimaan Returns On Doordarshan: 90 च्या दशकातील प्रसिद्ध शो शक्तिमान (Shaktimaan) आज 1 एप्रिल पासून रोज रात्री 8 वाजता दूरदर्शन वाहिनीवर प्रदर्शित केला जाणार आहे. एके काळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना अक्षरशः वेड लावणारा हा शो आता परत येतोय हे ऐकूनच या मालिकेच्या फॅन्सच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. मनोरंजनाची आजच्या काळाएवढी साधने नसताना या शो ने सर्वांना एकत्र आणले होते त्यामुळे अनेकांचे या शो शी संबंधित किस्से, आठवणी आहेत. या सर्व आठवणींना आज पासून पुन्हा उजाळा देण्याची संधी मिळणार आहे. हा शो आणि त्याच्या आठवणी ताज्या असल्या तरी तरी आता या शो ची स्टार कास्ट मात्र वयोमानानुसार पहिल्यापेक्षा वेगळी दिसत आहे. कोणाचे वृद्धापकाळाने केस गेले आहेत तर कोणाच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आहेत.मात्र त्यांची जादू अजूनही तशीच आहे. आज हा शो पाहण्यापूर्वी त्याची स्टार कशी दिसते हे आपण पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात शक्तिमान, गीता विश्वास, डॉक्टर जयकाल , तमराज किलविश ही सर्व पात्र कशी दिसतात.( हे ही वाचा- दूरदर्शन वर रसिकांच्या भेटीला पुन्हा येणार ' श्रीमान श्रीमती', 'चाणाक्य' सारख्या दर्जेदार मालिका; पहा या मालिकांच्या पुर्नप्रक्षेपणाच्या वेळा )
शक्तिमान स्टार कास्ट Recent Photos
शो मध्ये शक्तिमान ची भूमिका मुकेश खन्ना यांनीही साकारली होती, अजूनही त्यांना शक्तिमान याच नावाने ओळखले जाते.

शो मध्ये शक्तिमान गंगाधर तिलक यांची सहकारी गीता विश्वास यांची भुमिका वैष्णवी महंत यांनी साकारली होती. शक्तिमान आणि गीता विश्वास यांची लव्हस्टोरी सुद्धा यात दाखवण्यात आली होती.

शो मध्ये विलन ची म्हणजेच डॉ. जॅकाल हे पात्र ललित परिमू यांंनी साकारले होते.

शो मध्ये तमराज किलविश उर्फ सुरेंद्र पाल यांनी शो मध्ये आपल्या अभिनयाने अनेकांना घाबरवले होते.

शो मध्ये टॉम अल्टर (Tom Alter) यांंनी शक्तिमान च्या गुरुचे काम केले आहे.

नवाब शाह (Nawab Shah) यांनी शो मध्ये मेयर जेजे (Mayor JJ) ची भुमिका साकारली होती.

दरम्यान, शक्तिमान सोबतच अनेक अन्य जुन्या मालिका जसे की श्रीमान श्रीमती , चाणक्य या सुद्धा पुन्हा प्रक्षेपित केल्या जाणार आहेत. कोरोना व्हायरसच्या लॉक डाऊन काळात घरी बसून कंटाळलेल्या लोकांना त्यांचा फेव्हरेट टाईमपास आता पुन्हा पाहायला मिळणार आहे.