Salman Khan अखेरपर्यंत करणार Bigg Boss 13 चं होस्टिंग; पाहा काय म्हणाला सलमान शो सोडण्याबद्दल आणि कमी झालेल्या मानधनाबद्दल
A still of Salman Khan from the sets of Bigg Boss. (Photo Credits: File Photo)

Salman Khan To Continue Hosting Bigg Boss 13: बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान गेल्या दहा वर्षांपासून बिग बॉस हा रिऍलिटी शोचे होस्टिंग करत आहे. त्याने आत्तापर्यंत बिग बॉसचे 13 पैकी 10 सीझन होस्ट केले आहेत आणि चाहत्यांसह स्पर्धकांनी देखील त्याच्यावर होस्ट म्हणून सलमानलाच पसंती दिली आहे. पण 20 डिसेंबर रोजी दबंग 3 रिलीज झाल्यामुळे सलमान चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे आणि त्याचबरोबर त्याच्या आगामी ‘राधेः तुम्हारा मोस्ट वॉन्टेड भाई’ या प्रोजेक्टचे शूटिंगही करत आहे. आणि म्हणूनच काही दिवसांपासून अशा अफवा आहेत की सलमान आपल्या प्रकृतीच्या कारणामुळे हा रिअ‍ॅलिटी शो सोडत आहे.

पण 14 डिसेंबर 2019 रोजी प्रदर्शित झालेल्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये सलमान खानने खुलासा केला की याही पुढे शो चा होस्ट तोच असणार आहे. तो म्हणाला, “'बिग बॉस हा शो काही आठवड्यांसाठी वाढवण्यात आला आहे परंतु, माझं मानधन कमी करण्यात आलं आहे.”

शनिवारी सलमानने टायफॉइडमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या सिद्धार्थ शुक्लाला व्हिडिओ कॉल केला होता. सिद्धार्थशी बोलताना भाईजान यांनी बिग बॉस शोमुळे त्याला त्रास होत असल्याचे सांगितले आहे. तो म्हणाला की त्यांनी कार्यक्रमाचा कालावधी वाढवला पण त्याचं वेतन मात्र कमी झालं आहे.

आता ही सलमान खान आणि बिग बॉस चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, नाही का? मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सलमानने कबूल केले की बिग बॉस त्याचाच एक भाग झाला आहे परंतु त्याने नमूद केले की त्याला हा शो सोडावा असं देखील वाटतं.

Bigg Boss 13: जाणून घ्या सिद्धार्थ शुक्ला ला का करण्यात आले हॉस्पिटल मध्ये दाखल (Watch Video)

दरम्यान, बिग बॉस 13 बद्दल बोलायचं झालं तर, 15 डिसेंबर रोजी एव्हिक्शन होणार आहे. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्याच्या दोन स्पर्धकांना बिग बॉसचे घर सोडावे लागणार आहे. सिद्धार्थ शुक्ला सुरक्षित असल्याची घोषणा करताना सलमानने म्हटले की मधुरिमाला घराबाहेर काढले जात आहे पण दुसर्‍या दिवसापर्यंत तिला थांबण्यास सांगितले जाते. दुसर्‍या दिवशी तिच्याबरोबर आणखी एकाला घरातून बेदखल केले जाणार अशी सलमानने घोषणा केली. घरातून बाहेर जाणारी व्यक्ती शहनाज गिल असणार की विकास पाठक हे लवकरच कळेल.