Raju Srivastava Health Update: राजू श्रीवास्तव 15 दिवसांनी शुद्धीवर, खासगी सचिवांची माहिती
Raju Srivastava |

कॉमेडीयन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची प्रकृती सुधारत आहेत. वैद्यकीय उपचारांना ते प्रतिसाद देत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ते तब्बल 15 दिवसांनंतर शुद्धवर आले आहेत. राजू श्रीवास्तव (Raju Srivastava Health Update) यांचे खासगी सचिव रारवीत नारंग यांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत अद्ययावत वृत्त दिले आहे. या वृत्तात श्रीवास्तव यांची प्रकृती सुधारत असल्याचे म्हटले आहे. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीला आराम पडावा यासाठी त्यांचे चाहते, हितचिंतक प्रार्थना करत आहे. श्रीवास्तव यांच्या निकटवर्तींयांनीही त्यांच्या प्रकृतीबाबत हितचिंतकांनी प्रर्थना करावी असे अवाहन वारंवार केले आहे.

राजू श्रीवास्तव यांच्या सचीवांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांची प्रकृती हळूहळू ठिक होत आहे. डॉक्टरही त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने नजर ठेऊन आहे. श्रीवास्तव अद्यापही व्हेंटीलेटरवर आहेत. त्यांना आराम पडावा यासाठी देशभरातून प्रार्थाना केली जात आहे. (हेही वाचा, Comedian Raju Srivastav: कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका, जीम करताना ट्रेडमिलवर बेशुद्ध पडले)

राजू श्रीवास्तव यांना नवी दिल्ली (New Delhi) येथे जीममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे ते ट्रेडमिलवरच बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital ) उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेव्हापासून ते रुग्णालयातच आहेत. मधल्या काळात ते कोममध्ये गेले होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. मात्र, त्यांच्या निकटवर्तीयांनी या सर्व अफवांचे खंडण केले. सध्या ते उपचारांना प्रतिसाद देत असून, तब्बल 15 दिवसांनी शुद्धीवर आले आहेत. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहे.