'माझ्या नव-याची बायको' फेम राधिका चा मेकओव्हर पाहून गुरू-शनाया ची दांडीगुल, Watch Video
Majya Navryachi Bayko Fame Radhika (Photo Credits: Instagram)

सध्या खूप रटाळवाणी झालेली झी मराठीवरील मालिका 'माझ्या नव-याची बायको' (Majya Navryachi Bayko) आता लवकरच प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का देणार आहे. हा धक्का देणार आहे प्रेक्षकांची विशेष करुन महिलांची आवडती राधिका सूबेदार. सध्या राधिकाच्या आयुष्यात शनाया आणि गुरुनाथ हे वादळ पुन्हा आले असून सोसायटीनंतर आता तिच्या ऑफिसमध्येही या दोघांनी राधिकाच्या नाकी नऊ आणले आहे. हे सर्व होत असताना अचानक राधिकाचा मेकओव्हर गुरु-शनायाची दांडीगुल करणार आहे. या मेकओव्हरचा प्रोमो प्रेक्षकांमध्ये सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

या प्रोमोमध्ये राधिका एका पांढ-या रंगाच्या ड्रेसमध्ये पत्रकारांसमोर येत असताना दिसत आहे. त्यावेळी तेथे गुरु आणि शनाया देखील दिसत आहे. राधिकाचा हा मेकओव्हर पाहिल्यावर त्यांची काय अवस्था होते पाहा या व्हिडिओमध्ये

हेही वाचा- Birthday special : तुमच्या आवडत्या राधीकाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्या

राधिका जेव्हा 300 कोटीच्या कंपनीची मालकीण झाली तेव्हा तिचा कोटमधील मेकओव्हर देखील तितकाच चर्चेचा विषय ठरला होता. किंबहुना अनेकांनी या लूकसह आपल्या राधिकेला डोक्यावर उचलून धरले होते. मात्र सध्या तोच तोच पणा या मालिकेत आल्यामुळे ही मालिका प्रेक्षकांना खूपच कंटाळवाणी आणि रटाळ वाटू लागली होती. म्हणूनच कदाचित या मालिकेच्या दिग्दर्शकांनी हा ट्विस्ट आणला असावा. राधिकाचा हा नवीन लूक प्रेक्षक किती पसंत करतात हे लवकरच कळेल.