ती महिला सशक्तीकरणाचे एक उत्तम उदाहरण आहे. ती स्वतंत्र आहे, हुशार आहे, विचारांनी उदारमतवादी आहे. आपल्या आजूबाजूच्या लोकांची तिला काळजी आहे, तिला खोटेपणाची चीड आहे. म्हणूनच या जगात स्वतःला सिद्ध करण्यासाठीची तिची धडपड इतरांसाठी मार्गदर्शनपर उदाहारण ठरतआहे. अशी ती म्हणजे अतिशय कमी कालावधीमध्ये प्रत्येक घराघरात पोहोचलेली राधिका म्हणजेच अनिता दाते-केळकर. गेली कित्येक महिने आपण ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधून राधिकाची कथा पाहत आहोत. राधिकाच्या सुख दुःखाशी प्रेक्षक इतके समरसून गेले आहेत की, राधिका सुभेदार नावाचे फक्त एक काल्पनिक पात्र आहे हेच ते विसरून गेले आहेत, म्हणूनच आज आम्ही हे पात्र साकारणारी नायिका अनिता दाते-केळकर हिच्या वाढदिवसाबद्दल काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.
> 31 ऑक्टोबर 1980 साली नाशिक येथे अनिताचा जन्म झाला. शालेय जीवनात अनिताला खेळामध्ये फारच रुची होती. पुढे जाऊन तिने ललित कला केंद्र मधून एमएचे शिक्षण पूर्ण केले आणि आपले काका उपेंद्र दाते यांच्यासोबत मराठी रंगभूमीवर कामे करण्यास सुरुवात केली.
> रंगभूमीवर काम करताना अनिताने मराठी मालिकांमध्येही कामे करण्यास सुरुवात केली. आपल्या भूमिकेबद्दल ती फारच चूझी होती. म्हणूनच अतिशय कमी मात्र दर्जेदार भूमिका अनिताने साकारल्या. उदा – एका लग्नाची तिसरी गोष्ट, अग्निहोत्र, बालवीर पैकी एका लग्नाची तिसरी गोष्ट ही मालिका अनितासाठी टर्निंग पॉईट ठरली.
> ‘सिगारेट’ नाटकाच्या तालिमीदरम्यान अनिताची चिन्मय केळकर या तरुणाशी भेट झाली. भेटीचे रूपांतर ओळखीत आणि ओळखीचे प्रेमात झाले. जवळजवळ 18 महिन्यांच्या लिव्ह-इन-रिलेशन नंतर त्या दोघांनी लग्न केले. चिन्मय लेखक आणि दिग्दर्शक असून सध्या हे दोघेही मुंबईस्थित आहेत.
> अनिताच्या कारकीर्दीमधील सर्वात वेगळी भूमिका म्हणून ‘अय्या’ चित्रपटाकडे पाहता येईल. बोलण्याची ढब, तिचा मेकअप आणि आउटफिट यांमुळे या भूमिकेमधून अनिताने लोकांचे लक्ष वेधून घेतले.
> 2016 साली अनिताने ‘माझ्या नवऱ्याची बायको’मार्फत छोट्या पडद्यावर पुन्हा पुनरागमन केले. विवाहबाह्य संबंधावर बेतलेल्या या मालिकेमुळे राधिकाने फार लवकरच तमाम मराठी प्रेक्षकांची मने जिंकली. सध्या ती प्रसिद्ध मराठी ताराकांपैकी एक आहे. अनिताचे हे पात्र नागपूरचे असल्याने अनिताने खास नागपुरी शैलीतील मराठी या मालिकेसाठी शिकून घेतले.
> आपल्या खऱ्या आयुष्यात अनिता फार शांत स्वभावाची आहे. गोंधळ, गडबड, पार्टी यांपेक्षा अनिताला स्वतःसोबत वेळ व्यत्तीत करायला आवडतो. अनिताला वाचन आणि लिखाण यांमध्ये विशेष रस आहे. पुण्यातील एफसी रोड ही अनिताची आवडती जागा, जिथे ती दिवसाचा कोणताही वेळ एन्जॉय करू शकते.
View this post on Instagram
> भारताची एक जबाबदार नागरिक म्हणून अनिताला रस्त्यांवर थुंकणाऱ्यांची विशेष चीड आहे. अनिताला सेल्फी घेणे अजिबात आवडत नाही.
> अनिताच्यामते विविध कलाकारांची कामे बघतच ती शिकत आहे, पैकी मुक्ता बर्वेचे काम तिला फार आवडते. अनिता नेहमीच मुक्त बर्वे’कडून प्रेरणा घेत असते.
> फार कमी जणांना माहित असेल की अनिता ही समाजसेविका देखील आहे. नुकतीच अनिता एनजीओ पाणी फाऊंनडेशनच्या एका कार्यात सहभागी झालेली दिसली. जिथे तिने सामान्य लोकांसोबत फिल्डवर काम केले.