
Sampath J Ram Suicide: कन्नड स्टार संपत जे. राम (Sampath J Ram ) यांचे वयाच्या 35 व्या वर्षी निधन झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 22 एप्रिल रोजी अभिनेत्याने नेलमंगला येथील त्याच्या घरी आत्महत्या केली. अभिनेत्याच्या निधनाची बातमी समजताच कन्नड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संपत जे. राम काही काळ काम न मिळाल्याने अस्वस्थ होता. त्यामुळे मानसिक तणावाखाली त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले. या प्रकरणावर अभिनेत्याच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया आलेली नाही. अभिनेत्याचा मृतदेह कर्नाटकातील नेलमंगला येथील खासगी रुग्णालयात आहे.
संपत जे राम यांचा अंत्यसंस्कार त्यांच्या घरी एनआर पुरा येथे होणार आहे. सोशल मीडियावर अनेक स्टार्सनी अभिनेत्याच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्याचवेळी दिवंगत अभिनेत्याचे सहकलाकार असलेले राजेश ध्रुव यांनीही सोशल मीडियावर पोस्ट लिहून शोक व्यक्त केला. (हेही वाचा - Singham Again: ‘सिंघम अगेन’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; लवकरच शूटिंगला सुरुवात)
संपतच्या व्रर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर त्याने 'अग्निसाक्षी' सारख्या सुपरहिट मालिकेत काम केले. याशिवाय 'श्री बालाजी फोटो स्टुडिओ' या चित्रपटातही या अभिनेत्याने आपले अभिनय कौशल्य दाखवले. नुकताच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे समीक्षकांनीही भरभरून कौतुक केले होते.