Nia Sharma Birthday Celebration: निया शर्मा ने 30 व्या वाढदिवसानिमित्त कापला Penis-Shaped Cake; पहा फोटोज
Nia Sharma's birthday celebration pics (Photo Credits: Instagram)

Nia Sharma Birthday Photos:  टीव्ही अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) हिचा काल (17 सप्टेंबर) 30 वा वाढदिवस होता. नियाने 30 वा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा केला. तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोज, व्हिडिओजही समोर आले आहेत. हे फोटोज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. याचे कारण म्हणजे तिचा बर्थडे केक. गोव्यात झालेल्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी नियाच्या मित्र-मैत्रिणींनी तिच्यासाठी Penis-Shaped Cake आणला होता. तो केक कापताना तिच्या चेहऱ्यावरील हावभाव कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहेत. (पृथ्वीवरची सर्वात कुरुप अभिनेत्री असं म्हणत निया शर्माला केले ट्रोल; अशा शब्दांत दिले उत्तर)

मेणबत्त्या विझवून क्रिमयुक्त पेनिस केक कापून नियाने आपला 30 वा वाढदिवस अगदी दणक्यात साजरा केला. या सेलिब्रेशनमध्ये नियाचा जवळचा मित्र आणि अभिनेता अर्जुन बिजलानी (Arjun Bijlani) देखील सहभागी झाला होता. नियाने बर्थडे सेलिब्रेशनची धूम फोटोजच्या माध्यमातून इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. पहा नियाच्या 30 व्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ आणि फोटोज... (कलाकारांनी केलेल्या कामाचे पैसे द्या, अन्यथा त्यांच्यावरही आत्महत्या करण्याची वेळ येईल - निया शर्मा)

पहा फोटोज:

विशेष म्हणजे नियाच्या बर्थडे निमित्त केवळ Penis-Shaped Cake चं नव्हता तर एकूण 18 केक होते. त्यामुळे नियाच्या खास दिवसाचे सेलिब्रेशन मस्तच झाले असेल, यात वाद नाही. 'नागिन 4' मालिकेत निया शेवटची दिसली होती. त्यांनतर ती 'खतरों के खिलाडी' शो ची विजेती ठरली. दरम्यान, नियाचे हे वाईल्ड बर्थडे सेलिब्रेशन चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.