सोशल मिडियामुळे अनेक चाहते आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या बरेच जवळ आले. तसेच त्यांच्याशी संवादही साधू लागले. हा प्रकार अनेक सेलिब्रिटींसाठी प्रसिद्धीचे माध्यम ठरला असला तरी टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मासाठी (Nia Sharma) ही डोकेदुखी ठरला आहे. ट्विटरवर एका ट्रोलरने 'तू पृथ्वीवरची सर्वात कुरुप अभिनेत्री आहेस' असे म्हणतं तिला ट्रोल केले आहे. मात्र नियाने यावर परखड टीका न करता शांत पणे या ट्रोलरला उत्तर दिले आहे.
ट्विटरवर एका युजरने #NiaSharma हा हॅशटॅग वापरत नियाला ट्रोल केले. या ट्रोलरने न केवळ तिला कुरुप म्हणाला तर तिला ओव्हररेटेड सेलिब्रिटीही म्हणाला. इतकेच नव्हे तर तिच्या पीआरला फुलमार्क्स दिले पाहिजे असंही तो म्हणाला.
पाहा हे ट्विट:
I have No PR team to this day babe! 🙋♀️😊 i’m a natural I guess. https://t.co/kJ7DcXTB9O
— NIA SHARMA (@Theniasharma) November 22, 2019
हेदेखील वाचा- दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या सुरक्षेसाठी 200 पोलिसांची फौज तैनात
खरं ही कमेंट वाचून तिच्या अनेक चाहत्यांना राग आला किंबहुना कोणत्याही मुलीला राग येणे स्वाभाविकच आहे. मात्र नियाने याच्या एकदम विरुद्ध करत त्या ट्रोलरला सौम्य शब्दांत माझी कोणी पीआर टीम नाही, मी एकदम नॅचरल आहे, बच्चा असे लिहिले आहे.
निया शर्मा लवकरच 'नागीन 4' या हिंदी मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे. त्याचबरोबर 'एक हजारों में मेरी बहना है' आणि 'जमाई राजा'
या मालिकेतही दिसली होती.
त्यानंतर बरीच लोकप्रियता मिळवलेली निया 'खतरों के खिलाडी' या आठव्या सीझनमध्ये दिसली होती. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.