सिनेसृष्टीसह छोट्या पडद्यावरील अनेक स्टार्सला कोरोनाची लागण झाली आहे. यात आता 'देवों के देव महादेव' या मालिकेतील महादेवाची भूमिका साकारणारा अभिनेता मोहित रैनाला (Mohit Raina) कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वत: सोशल मिडियावरून याबाबत माहिती दिली आहे. अधिक उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहितने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. ज्या पोस्टखाली त्याने आपल्याला कोरोना झाल्याचे सांगितले आहे.
मोहितने शेअर केलेल्या एका फोटोत तो रुग्णालयाच्या बाहेर उभा आहे, तर दुसऱ्या फोटोत त्याच्या हाताला सलाईन लावलेलं दिसत आहे.हेदेखील वाचा- अभिनेता सोनू सूद याची COVID19 ची चाचणी निगेटिव्ह, चाहत्यांकडून आनंद व्यक्त
View this post on Instagram
या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, "मी जसं आत आणि बाहेर पाहतो तसं प्रार्थना करु लागतो. बाबा म्हणतात की प्रार्थनांचा उपयोग होतो. मी सर्वांना विनंती करतो की सुरक्षित राहा आणि माणुसकी म्हणून प्रार्थना करा. गेल्या आठवड्यात माझा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यापासून मी स्वःतला डॉक्टरांच्या हवाली केलं आहे. आता मी सुरक्षित आहे. दररोज मी वेगवेगळ्या भावना पाहत आहे. या लोकांमुळेच आपण सुरक्षित आहोत. कमीत कमी आपण घरात राहू शकतोच. मी लवकरच तुम्हाला भेटेन." असेही तो पुढे म्हणाला.
मोहित याआधी 'मिसेस सिरीयल किलर' या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. 'भौकाल' या वेबसीरीजमध्येही तो दिसला होता. ही वेबसीरीज पोलिसांच्या आयुष्यावर आधारित आहे. मोहितला ‘देवों के देव महादेव’ या मालिकेतून भरपूर प्रसिद्धी मिळाली होती. यात त्याने भगवान शंकरांची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. ‘उरी’ या चित्रपटातही तो दिसला होता. यात त्याने विकी कौशलच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली होती.