गेल्या काही दिवसांपासून झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'स्वराज्य रक्षक संभाजी' (Swarajya Rakshak Sambhaji) प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा होती. मात्र या मालिकेतील प्रमुख कलाकार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले असले तरीही प्रेक्षकांना धक्का देणारी आणखी एक गोष्ट घडली आहे. झी मराठीवर लवकरच 'माझा होशील ना' (Majha Hoshil na) ही नवी मालिका येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो दाखविण्यात आला आहे. मात्र ही मालिका कोणत्या मालिकेची जागा घेणार हे मात्र दाखवले गेले नाही. मात्र एकूणच परिस्थिती पाहता आणि स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेची कथा पाहता याच मालिकेची ही नवी मालिका जागा घेईल असे सांगण्यात येत आहे.
'माझा होशील ना' असं या नवीन मालिकेचं नाव असणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो झी मराठी वाहिनीच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या मालिकेत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण गौतमी (Gautami) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अनेक ज्येष्ठ कलाकार या प्रोमोमध्ये दिसतायत. प्रोमोवरून ही लव्हस्टोरी असल्याचं पाहायला मिळत असून प्रेक्षकांकडून मात्र संमिश्र अशा प्रतिक्रिया येत आहेत.
View this post on Instagram
नवीन मालिका 'माझा होशील ना' लवकरच.. #MazaHoshilNa #zeemarathi @gautamideshpandeofficial
गेली जवळपास दोन वर्षं या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं. मालिकेचा शेवटचा एपिसोड नुकताच गोरेगावच्या फिल्मसिटीमध्ये चित्रीत करण्यात आला आहे. त्यानंतर येत्या 14 फेब्रुवारीला पुण्यात मालिकेच्या शेवटच्या भागातली काही दृश्यं चित्रीत करण्यात येणार असल्याचं कळतंय.
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. त्यामुळे नव्या मालिकेची जितकी उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असेल तितकेच दु:ख स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका संपणार असल्याचे असेल.