अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) होस्ट करत असलेला एक मोठा टीव्ही क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती' चा 12 वा सीझन (Kaun Banega Crorepati 12) लवकरच येणार आहे. पण लॉन्च होण्यापूर्वी या सिझनने मोठा धमाका केला आहे. लॉकडाऊन दरम्यान केबीसी -12 ने आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम नोंदविला आहे. हा रेकॉर्ड शोच्या डिजिटल सिलेक्शन प्रोसेस (Digital Selection Process) शी निगडीत आहे. लॉकडाऊन असूनही पूर्ण जोमाने या शोची निवड प्रक्रिया सुरु झाली होती व यामध्ये लोकांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. माध्यमांच्या वृत्तानुसार, मागील वर्षाच्या तुलनेत यावेळी डिजिटल निवड प्रक्रियेत चार पट अधिक लोकांनी भाग घेतला आहे व अशाप्रकात्रे केबीसी 12 ने एक नवीन विक्रम प्रस्थापित केलां आहे.
प्रत्येक सिझनप्रमाणेच अमिताभ बच्चन याही सीझनचे प्रमोशन करताना दिसले. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, कौन बनेगा करोडपती-12 च्या निवड प्रक्रियेमध्ये लोकांचा मागील वर्षाच्या तुलनेत जास्त सहभाग होता. मागील महिन्यात, सोनी लिव्ह अॅपवर शोसाठी ऑडिशन डिजिटल पद्धतीने घेण्यात आली. अहवालानुसार, सोनी लिव्ह अॅपद्वारे ऑडिशन प्रक्रियेत 3.1 कोटी लोकांनी भाग घेतला आणि यावर्षी सहभागात 42 टक्क्यांनी वाढ झाली. यावेळी ऑडिशनसाठीही 12 हजाराहून अधिक सहभागी दिसले. मागील सीझनपेक्षा हे प्रमाण 3 पट जास्त आहे. (हेही वाचा: अमिताभ बच्चन यांनी दिले आयुष्मान खुराना, दीपिका पादुकोण, विराट कोहली अशा 7 सेलेब्जना खास चॅलेंज; जाणून घ्या कोणी केले पूर्ण)
या अहवालानुसार, सोनी लिव्ह डिजिटल बिझिनेस प्रोग्रामिंग अँड न्यू इनिशिएटिव्हचे प्रमुख, अमोग दुसाद यांनीही याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले, 'केबीसीसाठी डिजिटल ऑडिशन हे आतापर्यंतचे सर्वात जास्त आहे. डिजिटल ऑडिशनमध्ये सामान्य ज्ञान चाचणीत भाग घेणा्यांनी व्हिडीओ बनवून प्रतिसाद दिला. आता अंतिम फेरी होईल ज्यासाठी ऑडिशन फेरीच्या गुणांनुसार स्पर्धकांची निवड केली जाईल. मात्र अद्याप कौन बनेगा करोडपतीच्या लॉन्च तारखेविषयी कोणतीही घोषणा केलेली नाही.