Karbhari Lay Bhari Serial: झी मराठी वर लवकरच प्रसारित होणा-या 'कारभारी लय भारी' मालिकेतील या अभिनेत्याने 'लागिर झालं जी' मध्ये केले होते काम
Karbhari Lay Bhari (Photo Credits: Instagram)

लॉकडाऊनमुळे बंद झालेल्या मालिका आता पुन्हा सुरु झाल्या आहेत. मात्र गेल्या 6 महिन्यापासून त्रस्त झालेल्या प्रेक्षकांना काही वेगळं देण्याच्या प्रयत्नांत अनेक मालिकांनी आपला ट्रॅक बदलला. तर काही मालिका बंद होऊन त्या जागी नवीन मालिका आल्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून सर्व मराठी मनोरंजन वाहिनीवर नवनवीन मालिका आलेल्या पाहायल्या मिळाल्या तर काही नवीन मालिका येऊ घातल्या आहेत. यात सध्या झी मराठीवरील (Zee Marathi) चर्चेत आलेल्या आगामी मालिका 'कारभारी लयभारी' (Karbhari Lay Bhari) चा प्रोमो मुळे या मालिकेत कोण कलाकार असणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. मात्र काल त्या मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला असून या मालिकेत हिरोचा चेहरा दिसला. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून निखिल चव्हाण (Nikhil Chavan).

निखिलच्या नव्या लुकमुळे हा कलाकार नेमका कोण आहे याचा अनेकांना अंदाज आला नसेल. याआधी झी मराठीवर लोकप्रिय झालेली मालिका 'लागिर झालं जी' मधील हा अभिनेता आहे. या मालिकेत जरी मुख्य भूमिकेत नसला तरीही त्याने बरीच लोकप्रियता मिळवली होती. लागिर झालं जी या मालिकेत विक्याची भूमिका साकारली होती. जो भारतीय सैन्य दलात असतो. ऐकून धक्का बसला ना, पण हे खरे आहे निखिलच्या या नव्या लूकमुळे प्रोमो मधून अनेकांना अंदाज आला नसेल.

हेदेखील वाचा- 'लागिरं झालं जी' मालिकेचा शेवटचा आठवडा, 24 जून पासून सुरु होणार 'Mrs.मुख्यमंत्री' ही मालिका

कारभारी लय भारी ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकारणाची झिंग आणि प्रेमाचा रंग आता दोन्ही बी लढणार असे म्हणत झी मराठीने हा प्रोमो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. निखिलच्या या लूक लोक प्रचंड पसंत करत आहे. मात्र ही मालिका कोणत्या मालिकेची जागा घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'माझ्या नव-याची बायको' या मालिकेतील वळण पाहता या मालिकेची जागा निखिलची ही नवी मालिका घेऊ शकते.

अलीकडे आलेल्या अॅट्रॉसिटी या चित्रपटात देखील काम केले होते. त्याचबरोबर स्त्रीलिंग-पुल्लिंग या वेब सीरीज मध्ये आणि वीरगती या वेब शोमध्ये देखील त्याने काम केले होते. त्यामुळे कारभारी लय भारी या मालिकेत देखील तो राजकीय नेत्याच्या भूमिकेत दिसत आहे. लेटेस्टली मराठी कडून निखिलला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!