'लागिरं झालं जी' मालिकेचा शेवटचा आठवडा, 24 जून पासून सुरु होणार 'Mrs.मुख्यमंत्री' ही मालिका
Lagir Jhal ji (Photo Credits: Facebook)

झी मराठीच्या प्रेक्षकांमध्ये सध्या चर्चेचा विषय रंगतोय तो 24 जूनपासून सुरु होणा-या Mrs. मुख्यमंत्री (Mrs. Mukhyamantri) या मालिकेचा. जरूर आहे बात, यांचा एक वेगळाच थाट.. असे कॅप्शन असलेले प्रोमो आपल्याला सध्या झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळत आहेत. हे प्रोमो जितके मजेशीर वाटत आहेत तिथेच दुसरीकडे 'लागिरं झालं जी' (Lagir Jhal Ji) ही मालिका संपत असल्याकारणाने अज्या-शितलीच्या चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. भारतीय जवानांवर आधारित विषयावर सुरु झालेली ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिली. त्यात अज्या-शितली चे नि:स्वार्थी प्रेमही प्रेक्षकांना खूप भावले.

येत्या 24 जूनपासून संध्याकाळी 7.00 वाजता झी मराठी वाहिनीवर 'Mrs.मुख्यमंत्री' ही मालिका सुरु होणार आहे. सध्या या मालिकेचे धमाल प्रोमो पाहून प्रेक्षकांना आपले हसू आवरत नाहीय. प्रोमो वरुन प्रेक्षकांमध्ये या मालिकेविषयी उत्सुकता अजून वाढलीय.

मात्र हे सर्व असले तरी मागील 2 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास पात्र ठरलेली 'लागिरं झालं जी' ही मालिका या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. येत्या शनिवारी या मालिकेचा शेवटचा भाग पाहायला मिळेल.

हेही वाचा-'तुझ्यात जीव रंगला' मधील राणादा ची होणार एक्झिट? समोर आला नवा प्रोमो

या मालिकेतील शितली, अज्या, रावल्या, मामी, हर्षवर्धन ही सर्व पात्र प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतील. भारतीय जवानांवर आधारित अशी मालिका काढणे हे खरंच या मालिकेच्या टीमसाठी आव्हान होते. मात्र त्यांनी ते आव्हान खूप छान पद्धतीने स्विकारले. त्यामुळे या मालिकेप्रमाणे 'Mrs. मुख्यमंत्री' ही मालिका प्रेक्षकांची मने जिंकणार हे येत्या काही दिवसांतच कळेल.