
सोनी वाहिनीवरील (SONY) लोकप्रिय रिअॅलिटी शो इंडियन आयडॉल (Indian Idol 11) लवकरच आपल्या 11 व्या पर्वासह आपल्या भेटीला येणार आहे. हा कार्यक्रम टीव्हीवर प्रसारित होण्याआधीच चर्चेत आला आहे. सध्या या कार्यक्रमाचे प्रोमो दाखवले जात आहे. त्यात नेहा कक्कडला एका स्पर्धकाने केलेला किस खूपच चर्चेत आला आहे. पिंकविला ने दिलेल्या वृत्तानुसार, इंडियन आयडॉलच्या 11 व्या पर्वात आलेल्या एका स्पर्धकाला दिवाळी साजरी करण्यासाठी नेहा कक्कर (Neha Kakkar), विशाल दादलानी (Vishal Dadlani) आणि अनु मलिक (Anu Malik) या परीक्षकांपैकी एकाने चक्क 1 लाख रुपये दिले आहे. हा सर्वांसाठी विशेष करुन त्या स्पर्धकाची सुखद धक्का आहे.
या स्पर्धकाचे नाव दिवास असे असून तो झारखंड येथे राहतो. या स्पर्धकाने पैशांच्या आभावी गेल्या सहा वर्षांपासून आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली नव्हती. त्याने गेल्या सहा वर्षांत कंपनीमध्ये काम करत असताना केवळ आकाशात फुटणारे फटाके दूरुन पाहिले होते. पण ती साजरी करण्याचा सुखद अनुभव त्याने स्वत: घेतला नव्हता. यंदाची दिवाळी स्पर्धकाने आपल्या कुटुंबासोबत आनंदाने साजरी करावी यासाठी नेहाने त्याला एक लाख रुपये भेट म्हणून दिले आहेत.
हेदेखील वाचा- 'Indian Idol 11' च्या ऑडिशनमध्ये गायिका नेहा कक्कड ला पाहून स्पर्धकाचा तोल घसरला, केले असे काही की परीक्षक ही झाले अवाक्
त्या स्पर्धकाची ही कहानी ऐकून नेहा खूप भावूक झाली आणि तिने त्याला ही अनमोल भेटवस्तू दिल्याचे बोलले जात आहे. हे पाहून सेटवरील सर्वच लोक आश्चर्यचकित झाले.
इतकच नव्हे तर पिंकविला ने दिलेल्या वृत्तानुसार, नेहाने त्या स्पर्धकाला आपल्या कुटूंबियांसाठी नवे कपडे आणि मिठाई घेऊन जाण्याचा सल्लाही दिला. नेहा ही जितकी चुलबुली आहे तितकीच ती भावूक आहे. इतकच नव्हे तर मागे एका कार्यक्रमादरम्यान तिच्या ब्रेकअपमुळे ती गाणे गाताना रडली होती. हे पाहून तिच्या चाहत्यांना खूप दु:ख झाले आणि त्यांनी तिला धीर दिल्यामुळे तिने तो कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.