'Indian Idol 11' च्या ऑडिशनमध्ये गायिका नेहा कक्कड ला पाहून स्पर्धकाचा तोल घसरला, केले असे काही की परीक्षक ही झाले अवाक्
Indian Idol 11 (Photo Credits: Instagram)

नी (Sony)वाहिनीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल' (Indian Idol 11) चे 11 वे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्यांना गायनाची आवड आहे किंवा ज्यांचे गायिकीमध्ये काही तरी चांगले करुन दाखवण्याचे स्वप्न आहे असे स्पर्धक या शो च्या मंचावर येऊन गाणे सादर येतात. असेच काहीसे स्वप्न घेऊन आलेला इंडियन आयडॉलच्या पहिल्या पर्वाचा विजेता अभिजीत सावंत याला या शो मुळे खूप प्रसिद्ध मिळाली. त्यामुळे या शो च्या प्रत्येक पर्वाची उत्सुकता लोकांमध्ये वाढली. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही असेच भन्नाट गायक आपल्याला या शोमध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र या शो मध्ये एक असाही अवलिया पाहायला मिळाला ज्याने या स्पर्धेची परीक्षक तसेच सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कड (Neha Kakkar) हिच्याशी ऑन सेट असे काही केले की जे पाहून सर्वजण अवाक् झाले.

नेहा कक्कड हिच्या आवाजाने सध्याच्या तरुणवर्गाला अक्षरश: वेडं लावलय. तसेच चाहत्यांच्या गुडबुक्स मध्ये असलेली नेहा आणि तिचा चुलबुली अवतारही चाहत्यांना खूप भावतो. असाच एक चाहता इंडियन आयडॉल 11 व्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी होण्यास ऑडिशन देण्यासाठी आला होता. नेहा ला पाहून या स्पर्धकाचा तोल घसरला आणि त्यानंतर त्याने जे काही केले ते सर्वांना अवाक् करणारे होते.

पाहा व्हिडिओ

स्पर्धकाची ही कृती पाहून नेहाला अक्षरश: शरमल्यासारखे झाले. तर या शोच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळलेला आदित्य नारायण आणि शोचे इतर परीक्षक विशाल ददलानी आणि अनु मलिक यांच्या प्रतिक्रियाही खूप वेगळ्या होत्या. नेहा कक्कडच्या मादक अदांसोबत 'खेला लूडो'चा Video व्हायरल

आता नेमकं काय झाले हे पाहण्यासाठी इंडियन आयडॉल 11 चे पर्व पाहावे लागेल. कधी कधी खोडकर तर कधी कधी अँग्री यंग मॅनच्या भूमिकेत असेलले गायक अनु मलिक स्पर्धकाच्या या कृत्यावर काय करतात हे लवकरच कळेल.