
आपल्या सुरेल आवाजाने तरुणाईला फिदा करणारी गायिका नेहा कक्कडचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत नेहा गाताना नव्हे तर, चक्क डान्स करताना दिसत आहे. नेहा पहिल्यांदाच डान्स फ्लोरवर उतरली आहे. पण, बाकी काही असले तरी, डान्स करताना नेहाच्या एक-एक आदा पाहणाऱ्यांचा कलेजा खलास करतात. सोशल मीडियावर या व्हिडिओला प्रचंड लाईक आणि शेअर केले जात आहे.
या व्हिडिओत नेहा आपला भाऊ टोनी कक्कडचे गाणे 'लोडो'ला प्रमोट करताना दिसते. या गाण्यासाठी म्हणे ती पहिल्यांदाच डान्स फ्लोरवर उतरली. आपल्या या हटके डान्सचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवरही शेअर केला आहे. जो सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. कारण तिच्या बहुतांश चाहत्यांनी आजवर तिला केवळ गातानाच पाहिले आहे.
दरम्यान, या व्हिडिओत नेहासोबत कोरिओग्राफर 'मेल्विन लुईस'ही दिसत आहे. लाल रंगाच्या आउटफिट्समध्ये नेहाचा अंदाज काही वेगळाच दिसतो आहे. नेहाचा भाऊ टोनी याने हा व्हिडिओ युट्यूब चॅनल मेल्विनवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ युट्युबवर आल्यावर आतापर्यंत सुमारे १४ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
आपल्याला माहितीच असेल आतापर्यंत नेहा कक्कड बॉलिवूडमध्ये बरेच नाव कमावले आहे. तसेच, अलिकडे आलेल्या 'काला चश्मा', 'लडकी ब्यूटीफूल' या तिच्या गाण्यांनीही तरुणाईला चांगलेच आकर्शीत केले होते. दरम्यान, ती सध्या 'इंडियन आयडॉल'नावाच्या एका रिअॅलिटी शोसाठी जज म्हणूनही काम पाहते आहे.