Hruta Durgule Clarification: फुलपाखरू मालिकेने हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ला ओळख मिळवून दिली. सध्या हृता 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zal) या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान हृता दुर्गुळेने मालिकेतून निरोप घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. मात्र, आता अभिनेत्रीने स्वत: यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. हृता 'मन उडू उडू झालं' मालिका सोडत असल्याची बातमी सर्वत्र व्हायरल झाली होती. हृताने हा निर्णय का घेतला असावा, असा प्रश्न सर्वांनाचं पडला होता. परंतु, या सर्व चर्चांवर हृताने स्पष्टीकरण दिले आहे. ‘मी ही मालिका सोडलेली नाही’, असे तिने या मुलाखतीदरम्यान म्हटलं आहे. हृताने एबीपी माझा या विहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी ती म्हणाली, “मी ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका सोडलेली नाही. या केवळ अफवा आहेत. सध्या मी या मालिकेचे शूटिंग करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी आणि चाहत्यांनी कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये”, अशी विनंती हृताने केली आहे. (हेही वाचा - Virajas Kulkarni Shivani Rangole Wedding: शिवानी रांगोळेच्या हातावर सजली विराजसच्या नावाची मेहंदी; पहा त्यांचा क्यूट व्हिडिओ)
प्राप्त माहितीनुसार, अभिनेत्री हृता आणि ‘मन उडू उडू झालं’ मालिकेच्या निर्मात्यांचे सेटवर स्वच्छतेच्या कारणांवरून भांडण झाले होते. हा वाद जास्त वाढल्याने हृताने ही मालिका सोडण्याचा तडकाफडकी निर्णय घेतल्याची चर्चा सुरू होती. मात्र, आज हृताने या सर्व चर्चांना अफवा असल्याचं सांगत मालिका सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
View this post on Instagram
हृताने ‘फुलपाखरु’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत हृता दिपूची भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेतून तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेत इंद्रा आणि दिपूची हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.