अक्कासाहेब पुन्हा येत आहेत प्रेक्षकांच्या भेटीला... पण नव्या रूपात (See Photos)
Harshada Khanvilkar (Photo Credits: Facebook)

स्टार प्रवाह वाहिनीवर 30 ऑक्टोबरपासून ‘रंग माझा वेगळा’ ही नवी मालिका सुरु होत आहे. सौंदर्याचा अर्थ फक्त गोरा रंग नसून त्याहीपलीकडे मनाचे आंतरिक सौंदर्यही तितकंच महत्त्वाचं असतं हे पटवून देणारा या मालिकेचा विषय असणार आहे.

या नव्या मालिकेतील विशेष बाब म्हणजे अक्कासाहेब अर्थात हर्षदा खानविलकर पुन्हा येत आहेत प्रेक्षकांच्या भेटीला. पण यावेळी मात्र त्या खूपच वेगळ्या रूपात दिसणार आहेत. त्यांची पुढचं पाऊल या मालिकेतील अक्कासाहेब ही भूमिका प्रेक्षकांमध्ये विशेष गाजली. आणि आता त्या सौन्दर्या इनामदार या व्यक्तिरेखेसह प्रेक्षांना दिसणार आहेत.

या मालिकेतील त्यांचा लुक पहा फोटोंमधून

Harshada Khanvilkar in new look (Photo Credits: File Image)

Star Pravah वर सुरु होत आहे एक नवी कहाणी- ‘रंग माझा वेगळा’ (Watch Promo)

आपल्या नव्या भूमिकेविषयी हर्षदा सांगतात, "३ वर्षांहून अधिक काळ मी पुढचं पाऊल या मालिकेतून अक्कासाहेब मी भूमिका साकारली. पण आता माझं नव्याने आयुष्य सुरु होतंय असं म्हण्टलं तरी चालेल. सौंदर्या इनामदार नावाप्रमाणेच सौंदर्यावर प्रेम करणारी अत्यंत करारी अशी बिझनेस वुमन आहे. तुम्ही सुंदर असाल तर जगावर राज्य करु शकता असा विचार बाळगणारी आणि त्याप्रमाणे वागणारी अशी ही सौंदर्याची भूमिका असेल."