Ghanshyam Nayak (Photo Credits: Twitter)

सब टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) नट्टू काका (Nattu Kaka) म्हणजेच अभिनेता घनश्याम नायक (Ghanshyam Nayak) यांचे निधन झाले आहे. ते अनेक महिन्यांपासून कर्करोगाने त्रस्त होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचे दोन ऑपरेशन्सही झाले होते. ते 77 वर्षांचे होते. वयामुळे ते रोज शूटिंगला जाऊ शकत नव्हते परंतु, तरीही ते तारक मेहता... च्या टीमचा एक भाग होते. शोचे निर्माते असित मोदी यांनी ही माहिती शेअर केली आहे.

मोदी यांनी सांगितले की नट्टू काका बऱ्याच दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना कर्करोग होता. ते तारक मेहता का उल्टा चश्माशी अगदी सुरुवातीपासूनच जोडले गेले होते. नट्टू काकांनी आपल्या विनोदाने सर्वांना खूप हसवले. शोमध्ये ते जेठालालच्या सहायकाची भूमिका साकारायचे. घनश्याम नायक यांचा जन्म 12 मे 1944 रोजी झाला होता. ते 77 वर्षांचे होते. तारक मेहताची टीम अभिनेत्याच्या निधनाने अत्यंत दु: खी आहे.

असित मोदी यांनी एबीपी न्यूजला एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले, ‘घनश्याम नायक जी यांनी आमच्यासोबत शेवटच्या 3-4 महिन्यांपूर्वी सेटवर काम केले होते. प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते नंतर शूट करू शकले नाहीत.’ (हेही वाचा: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अटक; Drugs प्रकरणामध्ये NCB ची मोठी कारवाई)

घनश्याम नायक यांनी केवळ टीव्हीच नव्हे तर चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले आहे. 1960 मध्ये ते अशोक कुमार यांच्या 'मासूम' चित्रपटात बालकलाकार म्हणून दिसले होते. यानंतर ते बेटा, तिरंगा, आँखे, लाडला, क्रांतिवीर, आंदोलन, बरसात, माफिया, चाहत, इश्क, चायना गेट, तेरे नाम आणि खाकी यासह अनेक चित्रपटांचा भाग होते.