Aryan Khan Arrested: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अटक; Drugs प्रकरणामध्ये NCB ची मोठी कारवाई
Aryan Khan (Photo Credits: Instagram)

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) शनिवारी मुंबईतील क्रूज ड्रग पार्टीवर छापा टाकला आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) अनेक लोकांना ताब्यात घेतले. आता रविवारी एनसीबीने आर्यन खानसह तिघांना अटक केली आहे. ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीन लोकांमध्ये आर्यन खान व्यतिरिक्त अभिनेता अरबाज सेठ मर्चंट (Arbaz Seth Merchant) आणि मॉडेल मुनमुन धामेचा (Munmun Dhamecha) यांचा समावेश आहे. एनसीबी नुसार ड्रग्ज सेवनाच्या संदर्भात आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. एनसीबीने एनडीपीएस (NDPS) कलम 27 अंतर्गत अटक केली आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने शनिवारी रात्री उशिरा मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझ जहाजावर छापा टाकला, जिथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते अंमली पदार्थांचे सेवन केले जात होते. यापैकी 8 जणांना एनसीबीने ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली, त्यापैकी तीन जणांना आता अटक करण्यात आली आहे. तर नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा यांचीही रविवारी दिवसभर चौकशी करण्यात आली.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, ताब्यात घेतलेल्या आठ जणांपैकी तीन जणांना आज, रविवारी वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. सांगितले जात आहे की या पार्टीत 600 हाय प्रोफाइल लोक सामील झाले होते, ज्यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा समावेश होता. आर्यनला शनिवारी रात्री एनसीबीने ताब्यात घेतले त्यानंतर आज त्याची सतत चौकशी केली जात होती. (हेही वाचा: Alia Bhatt हिच्या विरोधात मुंबईत FIR दाखल, 'या' कारणामुळे वाढली समस्या)

अमली पदार्थविरोधी एजन्सीने यापूर्वी एका निवेदनात म्हटले होते, ‘आर्यन खानसह सर्व आठ जणांची चौकशी केली जात आहे. त्यांच्या विधानांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.’ एजन्सीने सांगितले की जहाजावरील पार्टीमधून एक्स्टसी, कोकेन, एमडी आणि चरस सारखे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.