Alia Bhatt हिच्या विरोधात मुंबईत FIR दाखल, 'या' कारणामुळे वाढली समस्या
आलिया भट्ट (फोटो सौजन्य-ट्वीटर)

बॉलिवूड मधील अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपुर (Ranbir Kapoor) यांच्या लग्नावरुन सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. अशातच कन्यादन संबंधित करण्यात आलेल्या ब्राइडल वेअर ब्रँन्डच्या जाहिरातीवरुनच लग्नाची सुरु झाली आहे. अशातच एका व्यक्तीला त्याबद्दल पटले नसून त्याने आलिया भट्ट हिच्या विरोधात सांताक्रुज मध्ये एफआयआर दाखल केला आहे. कन्यादानावरुन वाद हा फार जुना आणि बहुतांश वेळा बोलले ही गेले आहे. मात्र नुकत्यात आलियाच्या या जाहिरातीवरुन लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

खरंतर जाहिरातीवरुन हा वाद निर्माण झाला आहे. त्यामध्ये असे दाखवण्यात आले आहे की, शादीच्या मंडपात आलिया भट्ट वधूच्या रुपात असून ती बसली आहे. आपल्या माहेरच्या आठवणींना उजाळा देत इमोशनल होते. त्याचसोबत आपल्या आई-वडिलांसह तिच्या पालनपोषणाबद्दल बद्दल बोलत आलिया कन्यादानच्या परंपरेबद्दल प्रश्न उपस्थितीत करण्यात आले आहेत. हेच लोकांना आवडलेले नाही.(Dilip Chhabria's Son Arrested: कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांच्या मुलाला अटक, कपिल शर्माच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई)

आलियाची ही जाहिरात आल्यानंतर सोशल मीडियात काही लोकांनी आपल्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत. लोकांनी असे म्हटले की, धर्मातील अशी काही कृत्ये त्यांच्या विरोधात जागृकता पसरवली जात नाही, मात्र काही ब्रँन्ड्स असे आहेत की, ज्यांनी हिंदू धर्माविरुद्ध धार्मिक युद्ध पुकारले आहे.