Dilip Chhabria's Son Arrested: कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांच्या मुलाला अटक, कपिल शर्माच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई
Arrested | Representational Image | (Photo Credits: Facebook)

कॉमेडियन कपिल शर्माने (Kapil Sharma) मुंबई पोलिसांकडे आपली फसवणूक झाल्याची तक्रार केली होती. त्यात त्याने प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया (Dilip Chhabaria) यांचा मुलगा बोनिटो छाब्रियाच्या (Bonito Chhabaria) विरोधात फसवणूक केल्याची तक्रार केली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch)अधिकाऱ्यांनी बोनिटो छाब्रियाला चौकशीसाठी बोलावले होते. त्याची कसून चौकशी करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे.

कपिल शर्माने गेल्यावर्षी छाब्रियासह अन्य काही जणांविरोधात फसवणूकीची तक्रार दाखल केली होती. ज्यानंतर सिनेसृष्टीत एकच खळबळ माजली होती. कपिल शर्माने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, त्याने 2017 साली मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत छाब्रियाला व्हॅनिटी बस डिजाइन करण्यासाठी 5 कोटींहून अधिक पैसे दिले होते. मात्र, दोन वर्षांहून अधिक काळ उलटल्यानंतर कोणत्याही कामास सुरुवात न झाल्याने कपिल शर्माने 2019 साली नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल कडे धाव घेतली होती. हे देखील वाचा- Thalaivii on Netflix: कंगना रनौत हिचा 'थलाइवी' चित्रपट सिनेमागृहानंतर आता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित

ट्वीट-

दुसरीकडे, छाब्रिया यांनी गेल्या वर्षी कपिल शर्मा यांना व्हॅनिटी बसच्या पार्किंग शुल्कविषयी 1.20 कोटी रुपयांचे बिल पाठवले होते. त्यानंतर कपिल शर्माने पोलिसांत धाव घेऊन आपली तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दिलीप आणि त्यांचा मुलगा बोनिटो यांची चौकशी सुरु केली होती. त्यात बोनिटोची चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रँचने गेल्या वर्षी कारच्या कोट्यवधी विक्रीच्या झालेल्या घोटाळ्यात दिलीप छाब्रिया यांनाही अटक झाली आहे.