Thalaivii on Netflix: अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिचा सिनेमा थलाइवीने सिनेमागृहात आपला धमाका दाखवल्यानंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. आजपासून कंगनाचा थलाइवी हा नेटफ्लिक्सवर पाहता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. एएल विजय यांच्या द्वारे निर्देशित हा सिनेमा तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता (J. Jayalalithaa) यांच्या आयुष्यावर आधारित आहे.(अमिताभ बच्चन यांना NGO चे पत्र, पान मसाला जाहिरात न करण्याचे आवाहन)
सध्या थलाइवी सिनेमा हा हिंदी वर्जनमध्ये नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. याच्या दोन आठवड्यानंतर तमिळ आणि तेलगू भाषेत सुद्धा ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा रिलिज केला जाणार आहे. चक तमिळ आणि तेलगू वर्जनचे राइट्स चार आठवड्यांचे दिले आहेत. यासाठी दोन आठवड्यानंतर नेटफ्लिक्सवर तेलुगु आणि तमिळ भाषेत थलाइवी प्रदर्शित होणार आहे.(अभिनेत्री माधुरी दीक्षित ने सोशल मिडीयावर शेअर केले मनमोहक फोटो; पाहून तुम्ही ही व्हाल वेडे)
याची माहिती कंगना रनौत हिने स्वत: सोशल मीडियात पोस्ट करत दिली आहे. कंगना रनौत हिने सिनेमाचे पोस्टर शेअर केले असून त्यात आजपासून जगभरात थलाइवी नेटफ्लिक्सवर स्ट्रिमिंग होणार असल्याचे म्हटले आहे. कंगना हिच्या थलाइवी सिनेमाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया देण्यात आली आहे. बॉक्स ऑफिसच्या कलेक्शन बद्दल बोलायचे झाल्यास सिनेमाने साउथ इंडियामध्ये अधिक कमाई केली होती. उत्तर भारतात सिनेमाला आपली छाप पाडता आली नाही.