बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या पान मसालाच्या जाहिरातीमुळे सातत्याने चर्चेत आहेत. तर अमिताभ यांच्या व्यतिरिक्त अजय देवगन आणि शाहरुख खान सारख्या स्टार्स सुद्धा जाहिरातीत दिसून आले आहेत. ऐवढेच नाही तर अजय देवगन याच्या पान मसालाच्या जाहिरातीवरुन त्याला ट्रोल ही केले गेले आहे. यामध्ये आता अमिताभ बच्चन यांचे नाव जोडले गेले आहे. खरंतर अमिताभ बच्चन पान मसालाची जाहिरात करत असल्याने त्यांच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच आता नॅशनल अॅंन्टी टोबॅको ऑर्गेनाइजेशनने सुद्धा यामध्ये हस्तक्षेप केला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनजीओ द्वारे अमिताभ बच्चन यांना एक पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये त्यांना पान मसालाची जाहिरात न करण्याचे आवाहन केले आहे. पत्रात असे ही म्हटले, रिसर्च मधून असे समोर आले की पान मसाला आणि तंबाकूच्या सेवनाची सवय आरोग्याला हानिकारक आहे. अमिताभ बच्चन हे सरकार मधील हाय प्रोफाइल पल्स पोलिओ कॅम्पेनचे ब्रँन्ड अॅम्बेसेडर आहेत. अशातच त्यांनी पान मसालाची जाहिरात लवकरात लवकर सोडावी.
तसेच पत्रात असे ही लिहिण्यात आले की, अशा प्रकारचे काम बॉलिवूड मधील काही अभिनेते जसे शाहरुख खान, अजय देवगन, रणवीर सिंह आणि ऋतिक रोशन यांनी सुद्धा केले आहे. यामुळे तरुण वयातील मुलांमध्ये तांबाकू खाण्याचे प्रमाण वाढले आहे.(The Kapil Sharma मध्ये कोर्टरुम सीन वेळी ड्रिंक करण्यासंदर्भात निर्मात्यांच्या विरोधात FIR दाखल)
याच दरम्यान, अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट फेसबुकवर खुप व्हायरल झाली होती. त्यामध्ये असे लिहिले होते की, एक घड्याळ खरेदी करुन हातात काय घातले वेळ तर माझ्या मागेच पडली आहे. यावर एका सोशल मीडिया युजरने म्हटले की, प्रमाण सर, मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे की, तुम्ही सुद्धा कमला पसंद पान मसालाची जाहिरात केली. मग तुमच्यामध्ये आणि क्षुद्रांमध्ये काय फरक आहे?