Dakkhancha Raja Jotiba Title Song: आदर्श शिंदे याच्या दमदार आवाजातील 'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिकेचे शीर्षकगीत रिलीज (Watch Video)
Dakkhancha Raja Jyotiba Title Song ( Photo Credits: Youtube)

Dakkhancha Raja Jyotiba Serial Song: 'गणपती बाप्पा मोरया', 'विठू माऊली', 'जय मल्हार' यांसारख्या लोकप्रिय मालिकानंतर कोठारे व्हिजनची नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'दख्खनचा राजा ज्योतिबा' (Dakkhancha Raja Jyotiba) ही मालिका 23 ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. मालिकेतून ज्योतिबाचे चरित्र लोकांसमोर मांडण्यात येणार आहे. दरम्यान, मालिकेचे शीर्षकगीत रिलीज करण्यात आले आहे. ज्योतिबा हे भगवान शंकराचे रुप आहे. यापूर्वी महादेवाचे रुप असलेल्या खंडोबा चा चरित्र 'जय मल्हार' मालिकेतून प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा महादेवाचा अवतार असलेल्या ज्योतिबा मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास कोठारे व्हिजन सज्ज झाले आहे.

मंदार चोळकर यांच्या लेखणीतून गीताचे शब्द अवतरले आहेत. तर आदर्श शिंदे याचा आवाज गाण्याला लाभला आहे. गुलराज सिंग यांनी हे गीत संगीतबद्ध केले आहे. शीर्षक गीतात 'ज्योतिबाच्या नावानं चांगलभलं' चा जयघोष ऐकू येत आहे. (पहा 23 ऑक्टोबरपासून 'स्टार प्रवाह'वर सुरू होणार 'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिकेविषयी निर्माते महेश कोठारे काय म्हणाले...)

पहा व्हिडिओ:

विशाल निकम ज्योतिबाची भूमिका साकारणार आहे. तर बालकलाकार समर्थ पाटील ज्योतिबाचे बालपण पडद्यावर उभं करणार आहे. मालिकेचे शूटिंग कोल्हापूर येथे होणार असून त्यासाठी भव्यदिव्यं असा सेट उभारण्यात येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते, निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. या मालिकेत अनिता दाते, अद्वैत दादरकर आणि रुचिरा जाधव यांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत. 23 ऑक्टोबर पासून संध्याकाळी 6.30 वाजता स्टार प्रवाह वरील प्रेक्षकांना या मालिकेचा आनंद घेता येईल.