Dakhancha Raja Jotiba Serial: 23 ऑक्टोबरपासून 'स्टार प्रवाह'वर सुरू होणार 'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिका; 'हा' कलाकार साकारणार ज्योतिबाची भूमिका
Dakhancha Raja Jotiba (PC - Twitter)

Dakhancha Raja Jotiba Serial: 'स्टार प्रवाह'वर 23 ऑक्टोबरपासून ज्योतिबाचं माहात्म्य सांगणारी 'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिका (Dakhancha Raja Jotiba Serial) सुरू होणार आहे. ही मालिका शुक्रवारपासून सायंकाळी 6:30 वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या मालिकेत विशाल निकम (Vishal Nikam) हा कलाकार ज्योतिबा (Jotiba) ची भूमिका साकारणार आहे. विशाल निकमने यापूर्वी 'सात जलमाच्या गाठी' या मालिकेत मुख्य कलाकाराची भूमिका साकारली होती. स्टार प्रवाहाने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केला आहे. यात मालिका 23 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेची निर्मिती ज्येष्ठ दिग्दर्शक-अभिनेते महेश कोठारे करत आहेत. विशेष म्हणजे या मालिकेचं संपूर्ण चित्रीकरण ज्योतिबाचं देवस्थान असलेल्या कोल्हापूर नगरीत होणार आहे. ज्योतिबाचा जीवनप्रवास पाहण्यासाठी प्रेक्षक अतिशय उत्सुक आहेत.

ज्योतिबा हे संपर्ण महाराष्ट्राचं लोकदैवत आहे. त्यामुळे ही पौराणिक मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांनी सांगितलं की, ‘दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिकेसाठी कोल्हापुरमध्ये भव्यदिव्य सेट उभा करण्यात आला आहे. हा सेट उभारणं आमच्या टीमपुढं एक मोठ आव्हान होतं. मात्र, सर्वांच्या मदतीने हे काम पूर्ण होत आहे. या मालिकेच्या सेटमध्ये ज्योतिबाचा महाल, महालक्ष्मीचा महाल, गाव, आश्रम, क्रोमा फ्लोअर यांचा समावेश आहे. या मालिकेतील कलाकारांची वेशभूषा आणि दागिने अत्यंत पूरातन काळातील आहेत. त्यामुळे इतिहासातील दाखल्याच्या आधारे हे दागिन्यांची निर्मिती करण्यात आले आहे, असंही महेश कोठारे यांनी सांगितलं. हेही वाचा - Bigg Boss 14: सिद्धार्थ शुक्ला बिग बॉस च्या घरातून आला बाहेर, इंटरनेटवर लीक झाला Photo)

या मालिकेत ज्योतिबाच्या बालपणापासूनची कथा पाहायला मिळणार आहे. ज्योतिबाच्या लहानपणीची भूमिका बालकलाकार समर्थ पाटील साकारणार आहे. सर्मथने याआधी कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत देखील छोट्या बाळूमामांची भूमिका साकारली होती. या मालिकेत अभिजीत खांधेकर, अनिता दाते, अद्वैत दादरकर आणि रुचिरा जाधव यांच्यादेखील भूमिका असणार आहेत.