Coronavirus: लॉकडाउनच्या पार्श्वभुमीवर दुरदर्शन पुन्हा प्रसारित करणार रामायण-महाभारत
दूरदर्शन पुन्हा प्रसारित करणार रामायण-महाभारत (Photo Credits-Twitter)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) संपूर्ण देशभरात लॉकडाउनचे आदेश जाहीर करण्यात आला आहे. यामुळे घरी असलेली लोक विविध प्रकारे त्यांचा वेळ घालवत आहेत. तसेच कोरोना व्हायरसमुळे शुटिंग सुद्धा रद्द करण्यात असल्याने कोणतेही नवे चित्रपट किंवा मालिका सुद्धा प्रसिद्ध केले जात नाही आहेत.याचा फटका सिनेसृष्टीला होणारच आहे. पण टिव्ही चॅनल्सवर सध्या रिपिट टेलिकास्ट दाखवले जात आहेत.  मात्र घरी बसून कंटाळलेल्या प्रेक्षकांसाठी दुरदर्शन त्यांच्या आठवणीतले दोन कार्यक्रम लवकरच प्रसारित करणार आहे. दुरदर्शने रामायण (Ramayana)-महाभारत (Mahabharata) पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे.रामायण आणि महाभारत हे दुरदर्शन वरील प्रसिद्ध आणि लोकप्रिय टिव्ही शो पैकी एक आहे. या कार्यक्रमांनी प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात घर केले असून या मधील कलाकार सुद्धा प्रत्येकाच्या आठवणीत राहण्यासारखे आहेत.

रिपोर्ट्सनुसार, प्रसार भारतीचे शशि शेखर यांनी ट्वीट करत एका युजर्सला प्रश्नाचे उत्तर दिले आहे. त्यावेळी शेखर यांनी असे म्हटले आहे की, रामायण-महाभारत कोणत्या वेळेत प्रसारित केले जाईल याची वेळ लवकरच जाहिर केली जाणार आहे. तर 'द कपिल शर्मा' या शो मध्ये रामायण कार्यक्रमातील स्टार कास्ट यांनी उपस्थिती सुद्धा लावली होती.(Coronavirus Impact: नियमित प्रसारित होणाऱ्या 'या' मालिका बंद; त्या ऐवजी एकता कपूरच्या 3 लोकप्रिय वेब सिरीज टीव्हीवर पाहण्याची संधी, जाणून घ्या वेळ)

दरम्यान, रामानंद सागर निर्मित रामायण सन 1987 मध्ये शुट करण्यात आले होते. तसेच बी. आर, चोपडा निर्मित महाभारताचे शुटिंग सन 1988 मध्ये करण्यात आले होते. प्रथमच विज्ञानाच्या मदतीने छोट्या पडद्यावर भारतीय पौराणिक कथांवरली कार्यक्रम प्रसारित करण्यात आले होते. ज्यामुळे हे शो केवळ जास्तच पाहिले गेले नाहीत तर त्यांची लोकप्रियता आकाशाच्या उंचांपर्यंत गेली.