कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) सध्या देशात 21 दिवसांसाठी लॉक डाऊन जाहीर केले आहे. याचा फटका टीव्ही इंडस्ट्रीलाही बसला आहे. कोरोना विषाणूच्या संकटामुळे सर्व प्रकारचे शूटिंग आणि चित्रपट-मालिका निर्मितीवर सध्या बंदी आहे. अशा परिस्थितीत एकता कपूरला (Ekta Kapoor) तिच्या 'कुमकुम भाग्य' आणि 'कुंडली भाग्य' (Kumkum Bhagya and Kundali Bhagya) या दोन लोकप्रिय शोचे प्रसारण थांबविणे भाग पडले. मात्र या दोन शो ऐवजी चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी एकता नवीन शोद्वारे सज्ज झाली आहे. या दोन्ही शोच्या जागी एकताच्या वेब सीरिज 'कर ले तू भी मोहब्बत' व ‘केहने को हमसफर है’ सादर होणार आहेत.
कर ले तू भी मोहब्बत -
\\
केहने को हमसफर है -
छोट्या पडद्यावर लोकप्रियता मिळवल्यावर एकताने आपला मोर्चा चित्रपट आणि वेब सिरीजकडे वळवला होता. ALTBalaji या App वर एकताच्या सर्व वेब सिरीज प्रदर्शित होत आहेत. या App वरचा कंटेंट पाहण्यासाठी आपल्याला मासिक वर्गणी भरणे गरजेचे आहे. मात्र आता कोरोना व्हायरसमुळे या App वरील काही गाजलेल्या वेब सिरीज प्रेक्षकांना टीव्हीवर पाहता येणार आहेत. यामध्ये राम कपूर व साक्षी तन्वर यांची 'कर ले तू भी मोहब्बत' ही रात्री 9 वाजता, शर्मन जोशीची ‘बारिश’ रात्री 10 वाजता, तर गुरदीप कोहलीची ‘केहने को हमसफर है’ रात्री 10.30 वाजता प्रसारित होणार आहे. (हेही वाचा: Coronavirus मुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीतही 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेच्या निर्मात्यांची सरकारकडे अजब मागणी)
बारिश -
या तीनही वेबसिरीज झी टीव्हीवर प्रसारित होणार आहेत. ALTBalaji वर जेव्हा या सिरीज आल्या होत्या तेव्हा अतिशय कमी कालावधीमध्ये प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले होते. त्यानंतर अनेकदा या सिरीज टीव्हीवर कधी येणार अशी विचारणा होत होती. आता या लॉक डाऊनमुळे प्रेक्षकांना या वेब सिरीज पाहता येणार आहेत.