Bigg Boss Marathi 2, Episode 79 Preview: अभिजित बिचुकले करणार अन्नत्याग? आज बिग बॉसच्या घरात रंगणार कॅप्टन्सी टास्क
Bigg Boss Marathi 2, Episode 79 Preview (Photo Credit : Colors Marathi)

बिग बॉस मराठीच्या सीजन 2 (Bigg Boss Marathi 2) चा फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात काल अभिजित केळकर सारखा एक तगडा सदस्य घरातून बाहेर पडला. सर्वांनाच याचा धक्का बसला आहे मात्र घरातील इतर सदस्यांनी आता त्यांच्या पुढील खेळावर लक्ष केंद्रित केले आहे. आजच्या भागात नेहमीप्रमाणे घरातील इतर सदस्य बिचुकले यांची चेष्टा करताना दिसणार आहेत. बिचुकले यांना स्विमिंग पूलमध्ये टाकण्याचा सर्वांचा डाव आहे. यासाठी अनेक क्लुप्त्या वापरल्या जातात, शेवटी हा डाव यशस्वी होईल की नाही ते पाहण्यासाठी आजचा एपिसोड पाहावा लागले.

आता वीणा आणि शिव यांची जवळीक सर्वपरिचित आहे. दोघांनीही एकमेकांच्या प्रेमाचा स्वीकारही केला आहे. आजच्या एपिसोडमध्ये शिव वीणाला डान्स शिकवताना दिसणार आहे. तो वीणाला पकडून तिला उडी मारण्यास सांगतो, मात्र वीणाला डान्समधील D देखील माहित नसल्याने तिच्याकडून साधी उडी मारणेही होत नाही. शिवच्या अथक प्रयत्नानंतरही वीणा काहीच करू शकत नाही. (आजच्या एपिसोडमध्ये काय घडण्र आहे हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा)

बिचुकले स्वतः सदस्यांशी मस्ती करतात मात्र काहीवेळा ही मस्ती त्यांच्याच अंगाशी येते त्यावेळी त्यांचा रागही बाहेर पडतो. आजच्या भागात एका ठराविक सदस्याने त्यांची माफी मागितली नाही तर ते अन्नत्याग करतील असे सांगतात. त्यानंतर घरातील सध्याची कप्तान नेहा हिच्याशी त्यांचे फार मोठे भांडण होते. त्यानंतर सदस्यांना पुढचा कप्टान निवडण्यासाठी नवीन टास्क दिला जातो. आता हा टास्क नक्की कोण जिंकेल आणि कोण या आठवड्यासाठी सुरक्षित होईल ते आज रात्री समजेल.