Bigg Boss Marathi 2, Episode 78 Preview: अभिजीत बिचुकले ला हिंदी बिग बॉसमध्ये पाठवा - सलमान खान; आज 8 वाजता टेलिकास्ट होणार बिग बॉस मराठी 2
Bigg Boss Marathi 2 (Photo Credits: Twitter)

बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi)  च्या आजच्या (11 ऑगस्ट) विकेंडचा डाव एपिसोडमध्ये शोचे होस्ट महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या सोबत बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खानची एंट्री होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून सलमान खान (Salman Khan) बिग बॉस मराठीमध्ये हजेरी लावणार असल्याची चर्चा होती. अखेर आज सलमानच्या चाहत्यांचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे. महेश मांजरेकरांनी सलमान खानला घरातील सदस्यांशी ओळख करून दिली. यामध्ये पाहुणे म्हणून सध्या घरात असलेले अभिजीत बिचुकले यांची ओळख खास ठरली.

कवी मनाचे नेते अभिजीत बिचुकले यांनी सलमानसाठी हीना पांचाळसोबत 'देखा है पहली बार..' गाण्यावर खास डान्स केला. अभिजीत बिचुकलेंचं कौतुक करताना यांना हिंदी बिग बॉसमध्ये पाठवा असं सलमान म्हणाला आहे. पहा काय होणार आजच्या भागात 

अभिजीत बिचुकले आणि हीनाचा डान्स परफॉर्मन्स

बिग बॉस मराठी 2 मध्ये आज सलमान खानची खास एंट्री असल्याने विशेष भाग रात्री 8 वाजता टेलिकास्ट केला जाणार आहे. एरवी रात्री 9.30 वाजता बिग बॉस कलर्स मराठीवर सुरू होते. आता महेश मांजरेकरांबरोबर सलमान खान घरातील सदस्यांची कशी शाळा घेतोय? हे पाहणं उत्सुकतेचं आहे. सलमान खानने काही लहानपणीचे किस्से आणि आठवणीने सांगितल्या... लहानपणीचे आपल्या

सगळ्यांचे काही ना काही किस्से आहेत, आपण असे काही केले आहे ज्याने आपल्याला ओरडा देखील पडला आहे... सलमानने देखील असा एक किस्सा सांगितला जेंव्हा त्याने वडिलांना मिळालेला पगार जाळला, मग पुढे काय झाले ? हे तुम्हाला आजच्या भागामध्ये कळेल.

आजच्या आठवड्यात शिव ठाकरे, किशोरी शहाणे, आरोह वेलणकर आणि अभिजीत केळकर हे चार जण नॉमिनेशनमध्ये आहे.