Bigg Boss Marathi 2 Episode 49 Preview (Photo Credit : Colors Marathi)

बिग बॉस मराठीचे हे सीझन (Bigg Boss Marathi 2) फ्लॉप होण्याच्या मार्गावर असताना, त्याला पुन्हा रुळावर घेऊन येण्यासाठी निर्माते अनेक फंडे वापरत आहेत. यामध्ये काही इंटरेस्टिंग टास्कचीही भर पडत आहे. मात्र घरातील सदस्य त्याचाही पोरखेळ करत आहेत. असाच प्रत्यय कालचा भाग पाहण्यात आला. आता आज वीकएंड चा डावमध्ये काय घडेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. आजच्या भागात घराचा कप्तान असूनही अभिजितने एक महत्वाचा नियम मोडला आहे. त्याची शिक्षा म्हणून त्याला अडगळीच्या खोलीत ठेवण्यात येणार आहे. आता ही चूक नेमकी काय आहे ते एपिसोड पाहिल्यावरच समजेल.

आजचा वीकएंडचा डाव गाजणार आहे तो किशोरी आणि वीणा यांच्या वादाने. रुपाली, किशोरी आणि वीणा यांचा ग्रुप तुटल्याने या तिघीही आता स्वतंत्रपणे खेळत आहेत. मात्र वीणा आणि किशोरी यांच्यामधील शीतयुद्ध काही संपले नाही. गेला संपूर्ण आठवडा वीणा किशोरीशी ज्याप्रकारे वागत आहे त्याबद्दल वीणाला उत्तरे द्यावी लागणार आहेत. ‘ती तू गप्प बस’ हे वाक्य तिने अनेकवेळा उच्चारले आहे त्याबद्दल महेश मांजरेकर तिची शाळा घेणार आहेत. (हेही वाचा: 'शिवानी सुर्वे' ची घरवापसी; बिग बॉसच्या घरातील सदस्यांना मिळणार सरप्राईज? (Watch Video))

आजच्या भागातील सर्वात मोठे आकर्षण असणार आहे ते शिवानी सुर्वे हिची घरात झालेली एन्ट्री. नेहाला हाक मारत, तिला आय लव्ह यू म्हणत शिवानी बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे. शिवानी पाहुणी म्हणून येणार आहे का वाईल्ड कार्ड एन्ट्री आहे हे लवकरच समजेल. मात्र शिवानीच्या एन्ट्रीमुळे घरातील सदस्यांच्या चेहऱ्याचे रंग उडालेले आहेत हे नक्की. अशाप्रकारे आजच्या भागात बराच ड्रामा घडणार आहे हे उघडच आहे.