Bigg Boss Marathi 2: 'शिवानी सुर्वे' ची घरवापसी; बिग बॉसच्या घरातील सदस्यांना मिळणार सरप्राईज? (Watch Video)
Shivani Surve To Re Enter In Bigg Boss Marathi 2 House (Photo Credits: Instagram, Twitter)

बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi 2) घरात दर शनिवारी, महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) घरातील सदस्यांनी आठवडाभर घातलेल्या गोंधळाची शाळा घेतात, यामध्ये सदस्यांचे आरोप प्रत्यारोप ऐकून त्यांना रीतसर समज दिली जाते, याशिवाय चुगली बूथ, प्रेक्षकांचे प्रश्न सोबत एखादा छोटासा खेळ अशा रूपात वीकेंडचा डाव (Weekend cha  Daav) पार पडतो. पण यावेळी प्रेक्षकां सोबतच घरातील सदस्यांना देखील एक अनपेक्षित गिफ्ट मिळणार आहे. कलर्स मराठीने (Colors Marathi) आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये नेहा शितोळे (Neha Shitole) हिला घरात कोणीतरी हाक मारत आहे, त्यानंतर सगळे जण या आवाजाचा शोध घेऊ लागतात आणि तितक्यात कन्फेशन रुम मधून हातात एक बॉक्स घेऊन एक मुलगी प्रवेश करते, ही मुलगी म्हणजे इतर कोणी नसून शिवानी सुर्वे (Shivani Surve) आहे असा अंदाज बांधला जातोय.

शिवानी सुर्वे ही यंदा बिग बॉस मराठीच्या घरातून थेट नॉमिनेट न होता बाहेर पडलेली पहिली स्पर्धक आहे, तिने तब्येतीचे कारण सांगून बिग बोस जवळ घरातून बाहेर जाण्याचा हट्ट धरला होता, त्यानंतर तिच्यावर बरीच टीका सुद्धा झाली होती. मात्र लगेचच तिच्या घरवापसीच्या चर्चा देखील सुरु होत्या या सर्व चर्चांवर शिक्कामोर्तब करून आता अखेरीस शिवानी घरात परतणार असल्याचे निश्चित झाले आहे. शिवानीच्या घरातील पुन्हा आगमनामुळे तिची मैत्रीण नेहाला आनंद झालेला पाहायला मिळत आहे तर विरोधी टीमच्या सदस्यांच्या चेहऱ्यावर पुरते बारा वाजलेत. पाहा काय झालं कालच्या भागात? 

(Watch Video)

शिवानी सुर्वे हिच्या घरवापसीमुळे आता बिग बॉसच्या घरात कोणता धमाका होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे, मात्र ती वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात आली आहे की पाहुणी म्हणून याबाबत शोच्या निर्मात्यांनी कोणताच खुलासा केलेला नाही.तसेच शिवानीच्या पाठोपाठ आता चाहत्यांना बिचुकलेंच्या आगमनाची सुद्धा आस लागली आहे.